मराठी बातम्या /बातम्या /देश /Shivsena VS Shinde : निवडणूक आयोगाची खेळी? मध्यरात्री पाठवले 2 ई-मेल, शिवसेनेनं घेतला आक्षेप

Shivsena VS Shinde : निवडणूक आयोगाची खेळी? मध्यरात्री पाठवले 2 ई-मेल, शिवसेनेनं घेतला आक्षेप

कागदपत्रे दाखल केले असताना उद्यापर्यंत म्हणणे मांडण्याचे पत्र कसे काय पाठवले? आयोगाने केलेले निरिक्षण बेकायदा आहे

कागदपत्रे दाखल केले असताना उद्यापर्यंत म्हणणे मांडण्याचे पत्र कसे काय पाठवले? आयोगाने केलेले निरिक्षण बेकायदा आहे

कागदपत्रे दाखल केले असताना उद्यापर्यंत म्हणणे मांडण्याचे पत्र कसे काय पाठवले? आयोगाने केलेले निरिक्षण बेकायदा आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे? या संदर्भात आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर आपली कागदपत्रं सादर केली. मात्र, ठाकरे गटाने आज शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रावर आक्षेप घेत शिंदे गटाची कागदपत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाला केलेल्या ई-मेलमध्ये ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप नोंदवला आहे.

धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबद्दल निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून कागदपत्र सादर केली जात आहे. पण, रविवारी रात्री दोन ई-मेल आल्यामुळे गोंधळ उडाला आहे.

कागदपत्रे दाखल केले असताना उद्यापर्यंत म्हणणे मांडण्याचे पत्र कसे काय पाठवले? आयोगाने केलेले निरिक्षण बेकायदा आहे. निवडणूक आयोगाने पत्र पाठवणे आश्चर्यकारक आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी ४ आठवड्याचा अवधी द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाचे पत्र दिलेले होते. ही मेल आश्चर्यकारक होती. धनुष्यबाण चिन्हाबद्दल साडे चार वाजता उत्तर दिले होते. त्याची पोच पावती दिली आमच्या कडे आहे. कागदपत्र मिळाली नाहीत का याची तपासणी करतील. चिन्हाबद्दल २४ तासात उत्तर मागणे हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका अनिल देसाई यांनी केली.

२४ तासापेक्षा कमी वेळ उत्तर दिला होता. आज पुन्हा दुपारी उत्तर शिवसेना उत्तर देणार आहे. काल रात्री उशिरा दोन ईमेल ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाने पाठविले आहे. ठाकरे गटाने दिलेलं उत्तर हे अपेक्षाप्रमाणे नाही असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यापूर्वी शिवसेनेची निवडणूक झाली आहे त्यामधे २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे हे अध्यक्ष राहतील. एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्याच्या संख्यकडे पाहावे. अधिकृत सर्व कागदपत्र आहेत. या गोष्टीचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतली अशी अपेक्षा आहे. चिन्ह गोठवण्या संदर्भात कुठेलीही संकेत नाही, असंही देसाई यांनी ठामपणे सांगितलं.

First published:
top videos