कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार

कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार

सीमावर्ती भागात शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

  • Share this:

02 एप्रिल : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरात विधासभा निवडणुकीनंतर आता शिवसेना कर्नाटकमध्ये स्वबळावर 50 ते 55 जागा लढवणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याची घोषणा केलीय.  सीमावर्ती भागात शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा भागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. राज्यपालाच्या अभिभाषाणात सीमा भागाचा उल्लेख असतो, हे त्यांना शोभणारे नाही, असंही राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे अलीकडे शिवसेनेनं गुजरात विधानसभा निवडणूक लढवली होती. सुरतमध्ये शिवसेनेनं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. मात्र, गुजरातच्या जनतेनं शिवसेनेला साफ नाकारलं होतं. सेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त झालं होतं.

First Published: Apr 2, 2018 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading