'लोकशाही अजून जिवंत आहे', कर'नाटक' पाहून उद्धव ठाकरेंचा विरोधकांना खोचक टोला

'लोकशाही अजून जिवंत आहे',  कर'नाटक' पाहून उद्धव ठाकरेंचा विरोधकांना खोचक टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विरोधी पक्षांना सणसणीत टोला हाणला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं सरकार मंगळवारी (23 जुलै) विधानसभेत बहुमताअभावी कोसळलं आणि येथील राजकीय नाटक संपलं. सरकारनं विधानसभेत मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 91 तर विरोधी पक्ष भाजपच्या बाजूनं 105 मतं पडली. यानुसार भाजपच्या येडियुरप्पा यांच्या 'ऑपरेशन लोटस' मिशनला यश मिळालं. यावरूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विरोधी पक्षांना सणसणीत टोला हाणला आहे. 'लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची! सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने लोकशाहीची हुकमी युक्ती वापरली. तो टेकू आता थोडासा सरकला आणि कुमारस्वामी सरकारचा डोलारा कोसळला. याचा अर्थ स्पष्ट आहे लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही ती अशीच जिवंत राहील काय, एवढेच आता पाहायचे!', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

(पाहा :घरातूनच करा आता पाकमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक', पाहा हा SPECIAL REPORT)

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- लोकसभा निवडणुकीपूर्वी कुमारस्वामी सरकारच्या शपथविधीप्रसंगी देशभरातील भाजपविरोधी नेत्यांनी एकमेकांना मिठ्या मारून आणि हात उंचावून विरोधकांच्या एकीचे दर्शन देशाला घडवले होते. मात्र ही एकजूट किती पोकळ होती हेच कुमारस्वामींच्या गच्छंतीने सिद्ध केले.

- मोदीद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांवर काळाने उगवलेला हा राजकीय सूड आहे. एखाद्या रहस्यपटालाही लाजवतील अशा नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींनंतर कर्नाटकात होऊ घातलेले हे सत्तांतर देशभरात चर्चेचा विषय ठरले.

- जनता दल आणि काँग्रेसच्या आमदारांचे राजीनामे, राजकीय घोडेबाजार आणि आमदारांच्या खरेदीसाठी लागलेली कोट्यवधी रुपयांची बोली, सरकार बुडवण्यासाठी सरसावलेल्या आमदारांचा कर्नाटकच्या बाहेर झालेला पाहुणचार, त्या आमदारांना पळवण्यासाठी एका मंत्र्याने केलेले प्रयत्न, अल्पमत आणि बहुमताच्या लढाईतील सर्व राजकीय छक्के-पंजे यातून ‘लोकशाही म्हणजे काय?’ याचे अनोखे दर्शन देशातील जनतेला नक्कीच घडले असेल.

(वाचा :राज्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप, NCPचे 2 मोठे नेते करणार शिवसेना प्रवेश)

-  एखादा दिवा विझण्यापूर्वी जी अखेरची धडपड करतो तसेच कुमारस्वामींचे सरकार गेले महिनाभर आचके देत होते. आयसीयूत गेलेले सरकार विश्वासदर्शक ठराव टाळण्याचा प्रयत्न करत राहिले.

- मुंबईत पाहुणचार घेणाऱ्या बंडखोर आमदारांना मंत्रीपदाची आमिषे दाखवून शेवटपर्यंत हातपाय मारत राहिले. कुमारस्वामींना त्यात यश तर आले नाहीच, पण त्यांचे हसू मात्र झाले.

- जनता दलापुरते बोलायचे तर या पक्षाची आधीच शंभर शकले उडाली आहेत. दक्षिणेत वळवळणारे शेपूटही आता तुटले. त्यामुळे मुख्यमंत्री पद गमावल्याने सेक्युलर जनता दलास जो काही धक्का बसला असेल त्यापेक्षाही मोठा धक्का हे सरकार पडल्यामुळे काँग्रेसला बसला आहे.

(वाचा: नगरमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता, 'या' आमदाराने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट)

- काँग्रेस जरी आज भाजपवर घोडेबाजाराचा, आमदारांच्या खरेदीचा आरोप करत असली तरी त्यांना आपले आमदार का सांभाळता आले नाहीत हा प्रश्न उरतोच.

- लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची!

-  अवघे 37 आमदार असलेल्या कुमारस्वामींना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसवले. दुसऱ्या क्रमांकाच्या 78 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने लोकशाही जिवंत वगैरे ठेवण्यासाठी तिसऱ्याच्या साथीने सत्तेत सहभाग घेतला. सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने लोकशाहीची हुकमी युक्ती वापरली. तो टेकू आता थोडासा सरकला आणि कुमारस्वामी सरकारचा डोलारा कोसळला.

- याचा अर्थ स्पष्ट आहे लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही ती अशीच जिवंत राहील काय, एवढेच आता पाहायचे!

...म्हणून गाडी सोडून चंद्रशेखर बावनकुळेंनी केली 'लोकल वारी', पाहा VIDEO

First published: July 25, 2019, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading