शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांची पहिला प्रतिक्रिया

शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांची पहिला प्रतिक्रिया

शिवसेनेच्या नेतृत्वातच सरकार बनेल याचा आम्हाला विश्वास आहे. लवकरच चित्र स्पष्ट होईल.

  • Share this:

नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय. ही भेट राजकीय नव्हती असं सांगितलं जातंय. मात्र महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. तर मोदी-पवार भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा नरेंद्र मोदींना भेटले या सगळ्या घडामोडींमुळे राजधानीतलं वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होतेय. पवार मोदी भेटीमुळे शिवसेनेची धाकधूक वाढलीय. या भेटीवर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

संजय राऊत म्हणाले, शरद पवार मोदींना भेटले यात काहीही राजकारण नाही. राजकारणाशिवायही अनेक कामं असतात. पवार पंतप्रधानांना भेटू शकतात. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, ते भाजपलाच विचारा, मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लवकरच सरकार अस्तित्वात येणार आहे. अमित शहा मोदींना भेटले यात काहीही नवं नाही. गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना भेटावच लागतं.

सत्तेची कोंडी फोडण्यासाठी आता नवा फॉर्म्युला, अशी असेल मंत्रिपदाची वाटणी

शिवसेनेचे आमदार नाराज

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असताना शिवसेनेची कोंडी झाली आहे. आधी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अजूनही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपविरुद्ध निर्णायक लढाई छेडली. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सलगी केली आहे. मात्र शिवसेनेतील 17 आमदार पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याची माहिती आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडण्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या नाराज आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सध्या या नाराज आमदारांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती आहे.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

नाराज आमदार पश्चिम महाराष्ट्रातील?

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून मतभेद असलेले शिवसेनेचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या आमदारांनी स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन हा विरोध केला आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे

Published by: Ajay Kautikwar
First published: November 20, 2019, 3:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading