आप जिस स्कूल में पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, राऊतांनी शहांना सुनावलं

आप जिस स्कूल में पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, राऊतांनी शहांना सुनावलं

'विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मात्र त्या प्रत्येकाला देशद्रोही म्हणणं योग्य नाही. तुमच्या प्रमाण पत्राची आम्हाला गरज नाही. ही पाकिस्तानची संसद नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 11 डिसेंबर : लोकसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडलं. शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर चर्चाही सुरू झाली. ही चर्चा सहा तास चालणार असून त्यानंतर मतदान होणार आहे. अमित शहा यांनी विधेयक मांडतांना आक्रमकपणे आपली बाजू मांडली. लोकसभेत शिवसेनेने या बिलाला पाठिंबा दिला होता. नंतर मात्र भूमिका बदलत राज्यसभेत या बिलाला विरोध करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या प्रश्नावर शिवसेनेचे नेते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडत अमित शहांना चांगलेच टोले लगावले. आमच्या देशभक्तीला तुमचं प्रमाणपत्र नको असं सांगत त्यांनी अमित शहांना एक शेरही ऐकवला.

खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

संजय राऊत म्हणाले, या विधेयकाला काही लोक विरोध करताहेत तर काहींनी त्याचं समर्थन केलंय. विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मात्र त्या प्रत्येकाला देशद्रोही म्हणणं योग्य नाही. तुमच्या प्रमाण पत्राची आम्हाला गरज नाही. हिंदुत्वाबद्दलची आमची भूमिका ही जाहीर आहे. ती आजही कायम आहे आणि उद्याही कायम राहील. आम्हाला शिकविण्याची गरज नाही. ही पाकिस्तानची संसद नाही.

अमित शहांकडे बघून ते म्हणाले, हिंदुत्वके जिस स्कूल में आप पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है. बाळासाहेब ठाकरे, श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी हे त्या शाळेचे मुख्याध्यापक राहिले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

या विधेयकावर ज्या शंका आहेत त्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जावं असंही ते म्हणाले.

नाराज आहात का? असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...

लोकसभेत या विधेयकाच्या बाजुने 311 मतं मिळाली होती. लोकसभेत विधेयक मंजूर झालं असलं तरी राज्यसभेत मोदी सरकारची खरी परीक्षा असणार आहे. लोकसभेत बहुमत असल्यानं हे सहज झालं असलं तरी राज्यसभेत मात्र सरकारकडे बहुमत नाही. भाजपला आशा आहे की तीन तलाक, आर्टीकल 370 हटवण्याबाबतच्या विधेयकांना राज्यसभेची मंजुरी मिळवण्यात यश आलं होतं. त्याच पद्धतीने आताही येईल. विधेयकाबबत शिवसेनेनं लोकसभेत घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नाराज असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यसभेत आता आपल्या निर्णयापासून शिवसेना यूटर्न घेणार की आपल्या मतावर ठाम राहणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपमध्ये पडणार मोठी फूट? 24 तासांत चित्र होणार स्पष्ट

राज्यसभेत भाजपचे 83 खासदार आहेत. तर संयुक्त जनता दलाचे 6 खासदार आहेत. बिहारमध्ये नितिश कुमारांची सत्ता आहे. त्यांच्या पक्षाने या विधेयकाला लोकसभेत समर्थन दिलं आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दलाचे तीन, आरपीआय एक आणि इतर पक्षांचे 13 खासदार आहेत. या सर्वांचे मिळून एनडीएकडे 106 इतके संख्याबळ आहे. जदयुने जरी लोकसभेत समर्थन दिलं असलं तरी याबाबत पक्षात मतभेद आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 11, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading