राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं देशात फिरणं अवघड करू - संजय राऊत

राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं देशात फिरणं अवघड करू - संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं तर राम मंदिर बांधणं काही अवघड नाही. भाजपने संसदेत कायदा करावा त्याला शिवसेना तर पाठिंबा देईलच त्याच बरोबर अन्य पक्षांचे खासदारही पाठिंबा देतील.

  • Share this:

अयोध्या, ता.23 नोव्हेंबर : राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं देशात फिरणं अवघड करू असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ते अयोध्येत पत्रकारांशी बोलत होते. नोटबंदीचा निर्णय अवघ्या काही तासांमध्ये घेतला गेला. असं असताना राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीही अवघड नाही.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेनेचे दिग्गज नेते आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हे जाहीर सभा न घेता संतांचे आशीर्वाद आणि शरयू नदीची आरती करणार आहेत असं शिवसेनेने जाहीर केलंय.

राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपला टोला लगावला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं तर राम मंदिर बांधणं काही अवघड नाही. भाजपने संसदेत कायदा करावा त्याला शिवसेना तर पाठिंबा देईलच त्याच बरोबर अन्य पक्षांचे खासदारही पाठिंबा देतील.

उत्तरप्रदेश आणि केंद्रातही भाजपचच सरकार आहे त्यामुळं असा कायदा करणं अवघड नाही. भाजप असं का करत नाही ते माहित नाही असंही ते म्हणाले. बाबरी ढाचा शिवसेनेने पाडला त्यामुळं मंदिर बांधणं आम्हाला अवघड नाही असंही ते म्हणाले.

25 नोव्हेंबरलाच विश्व हिंदू परिषदेनेही अयोध्येत हुंकार रॅलीचं आयोजन केलंय. त्यामुळं शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद शक्तीप्रदर्शन करणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानही जोरदार तयारी केली असून सुरक्षेत वाढ केलीय.

First published: November 23, 2018, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading