06 एप्रिल : मी एअर इंडियाच्या विमानात जागेसाठी वाद घातला नाही, त्यानंच आधी माझी कॉलर धरली, शिवीगाळ करू लागले. मात्र, माझ्यासोबत गैरवर्तन करणारे मोकाट आहेत, असा प्रत्यारोप त्यांनी केला. पण याप्रकारामुळे संसदेचा अवमान झाला असल्यास मी माफी मागतो. मात्र, मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याची माफी मागणार नाही, असं शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड या वादानंतर आज (गुरुवारी) पहिल्यांदाच संसदेत दाखल झाले आहेत. खासगी विमानाने दाखल झालेले लोकसभेत बोलणार का याची उत्सुकता होती. गायकवाड यांच्या भाषणापूर्वी शिवसेना खासदारांनी लोकसभेत एअर इंडियाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे. माझ्यावर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, माझ्यासोबत गैरवर्तन करणारे मोकाट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप कसा लावला, कोणत्याही चौकशीविना माझी मीडिया ट्रायल सुरु आहे. पण आता या संसदेत मला न्याय मिळेल अशी आशा शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
एअर इंडियाच्याच कर्मचाऱ्याने माझ्याविरोधात दुर्व्यवहार केला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, माझ्यावरची विमान प्रवास बंदीही हटलवावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी कोणतंही आश्वासन दिलं न देता, खासदार विमानात चढला की तो आधी प्रवासी असतो, आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असं राजू सभागृहात म्हटलं होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा