लोकसभेत शिवसेनेनं केली स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

लोकसभेत शिवसेनेनं केली स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

एकीकडे शिवसेनेबरोबर युती करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे आणि तेही शिवसेनेनं उचलून धरल्यामुळे!

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : एकीकडे शिवसेनेबरोबर युती करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे आणि तेही शिवसेनेनं उचलून धरल्यामुळे! शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावं अशी मागणी केली आणि महाराष्ट्राच अनेकांच्या भुवया उंचावल्या. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना यांच्या पर्यायी सरकारचा विचार होताना शिवसेनेनं हिंदुत्वाला आणि वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला बाजूला ठेवावं अशी काँग्रेसची अट असल्याची सूत्रांची माहिती होती. आता शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच सावरकरांच्या मुद्द्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज राजेंद्र गावित यांनी सावरकरांचा मुद्दा उचलून धरत त्यांना भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा अशी मागणी केली. खासदार संजय राऊत यांनीसुद्धा सावरकरांना भारतरत्न द्यावं ही सेनेची मागणी कायम असल्याचं वक्तव्य मंगळवारी केलं होतं. हा मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने अडचणीचा ठरू शकतो.

वाचा - 'महाशिवआघाडी'ला विरोध.. काँग्रेस नेत्यांचा 'महाविकासआघाडी'वर जोर?

दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात राज्य सरकार सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल असं आश्वासन दिलं होतं. त्यासंदर्भात केंद्र सरकारने एक मोठं वक्तव्य केलं.  सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यासाठी शिफारस आली आहे का असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, अशी शिफारस जर करण्यात आली तर सावरकरांना 'भारतरत्न' दिला जाऊ शकतो. त्याच बरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले की, 'भारतरत्न' हा शिफारशीशिवाय देखील दिला जाऊ शकतो.

वाचा - उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' 3 नेत्यांची नावं आघाडीवर

केंद्र सरकारने घेतलेल्या या भूमिकेवर बोलताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर म्हणाले की, आम्ही कधीच अशा कोणत्याही सन्मानाची मागणी केलेली नाही. पण अशा प्रकारचा सन्मान दिल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू. वीर सावरकरांचे नातू रणजीत यांनी शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचं एकत्रित सरकार येणार यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं होतं, "मी उद्धवजींना जितकं ओळखतो, त्यानुसार ते हिंदुत्वाला कधीच तिलांजली देणार नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणीही ते सोडतील, असं वाटत नाही. मला खात्री आहे की, काँग्रेसची हिंदुत्वाबद्दलची भूमिका शिवसेना बदलेल."

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची वैचारिक बैठक शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या विरोधातली आहे. शिवसेना प्रमुख दिवंतगत बाळासाहेब ठाकरे यांची ओळख आजही हिंदुहृदयसम्राट अशीच आहे. आता या मागणीचा आणि या हिंदुत्वाच्या भूमिकेचा महाराष्ट्रात सरकार बनवताना विचार होईल का, त्यावर परिणाम होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

----------------------------------------

अन्य बातम्या

ती चूक आता पुन्हा नको.. काँग्रेस नेत्याचा थेट हायकमांडला सल्ला

VIDEO : 'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार'

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 21, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading