S M L

अनंत गीतेंकडून उड्डाण मंत्र्यांची काॅलर धरण्याचा प्रयत्न

अनंत गीतेंनी तर चक्क केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजूंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2017 04:50 PM IST

अनंत गीतेंकडून उड्डाण मंत्र्यांची काॅलर धरण्याचा प्रयत्न

06 एप्रिल : रवींद्र गायकवाड यांनी केलेली दादागिरी कमी होती की काय म्हणून शिवसेनेचे खासदार आणि मंत्री अनंत गीतेंनी तर चक्क केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजूंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सभागृहाच्या बाहेर घडला.

खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नाही आणि खासदार हाही प्रवासीच असतो, याचा राग मनात धरून गीतेंनी हे असभ्य वर्तन केलं. शेवटी राजनाथ सिंह, अनंत कुमार आणि स्मृती इराणींनी मध्यस्थी केली. म्हणून दोघांमधली हाणामारी टळली.

मुंबईहून विमानं उडू देणार नाही, अशी नेहमीची धमकी गीतेंनी दिलीय. राजनाथ सिंग यांनी गजपती राजू, गीते आणि लोकसभा अध्यक्षांशी चर्चा केली. आता गजपती राजू एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 04:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close