Home /News /national /

Goa Election 2022 : शिवसेनेची रणनीती, मनोहर पर्रीकरांच्या मुलाविरोधात गोवा माजी RSS प्रमुखाच्या मुलाला उमेदवारी

Goa Election 2022 : शिवसेनेची रणनीती, मनोहर पर्रीकरांच्या मुलाविरोधात गोवा माजी RSS प्रमुखाच्या मुलाला उमेदवारी

उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने पणजीतून गोवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा मुलगा शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

    पणजी, 21 जानेवारी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. गोव्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी भाजपविरोधात बंड पुकारत पणजीतून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. उत्पल पर्रीकर यांना शिवसेनेने पणजीतून उमेदवारीची ऑफर दिली होती. पण उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने पणजीतून गोवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा मुलगा शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने याआधी मनोहर पर्रीकर यांचा आदर म्हणून कोणत्याही पक्षाने (विशेषत: राष्ट्रवादी आणि काँग्रेस) उत्पल पर्रीकर यांच्याविरोधात उमेदवार उभं न करण्याचं आवाहन केलं होतं. पण उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने पणजीतून उमेदवार घोषित केला आहे. उत्पल पर्रीकरांनी नेमकी काय घोषणा केली? दरम्यान, उत्पल पर्रीकरांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि आपकडून देण्यात आलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली. आपण अपक्ष लढणार असून कोणत्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (IND vs SA : पंतने 85 रन ठोकून घडवला इतिहास, धोनी-द्रविडचा रेकॉर्ड मोडला) जेव्हा माझे वडील सक्रिय होते तेव्हा मी कधीच दिसलो नसेल. आता मला जे माझ्याबरोबर आहेत त्यांच्यासाठी उभं राहायचं आहे, असंदेखील उत्पल यावेळी म्हणाले. दरम्यान उत्पल पर्रीकर यांना शिवसेना आणि आपच्या ऑफरबद्दल विचारलं तेव्हा आपण कोणत्याही पक्षाची ऑफर स्विकारणार नसल्याचं ते म्हणाले. "मी माझ्याच पक्षाची ऑफर घेत नाहीय. तर दुसऱ्या पक्षाच्या ऑफरचा विचारच होऊ शकत नाही. ते माझ्या मनातच येणार नाही. दुसऱ्या पक्षाचा विचार माझ्या डोक्यात येऊच शकणार नाही", असं उत्पल यांनी स्पष्ट केलं. "मी माझ्या पक्षाकडेही मला काहीतरी हवंय म्हणून करत नाहीय. त्यांनी मला पर्याय सांगितले. मला लोकांना पर्याय द्यायचे आहेत. माझा विचार गोव्याच्या नागरिकांसाठी आहे. त्यांना पणजीतून जिथे माझा लोकांशी, कार्यकर्त्यांसोबत संबंध आहे, त्यांना ऑप्शन द्यायचं आहे. त्यांनी जर मला रिजेक्ट केलं तर मी मान्य करेन. मी अपक्ष लढत असलो तरी माझ्या मनात भाजप रोज असणार. मी आगामी परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे", अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या