Home /News /national /

शिवसेनेला पुन्हा धक्का? आता काँग्रेसमध्येही धुसफूस, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार? TOP बातम्या

शिवसेनेला पुन्हा धक्का? आता काँग्रेसमध्येही धुसफूस, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 6 जुलै : ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही शिवसेना पक्षाचं विघ्न संपत असल्याचं दिसत नाही. कारण, पक्षाला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul) हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील ही धुसफूस आणि फुट ताजी असताना काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावतीचे (Amravati) पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या (Umesh Kolhe Murder Case) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून प्रचंड जलद गतीने तपास सुरु आहे. राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा. शिवसेनेला पुन्हा झटका? शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul) हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातल्या झटक्यानंतर दिल्लीत शिवसेना सावध महाराष्ट्रामध्ये झालेल्या राजकीय भुकंपानंतर शिवसेना (Shivsena) दिल्लीमध्ये आधीच सावध झाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेने प्रतोद बदलला आहे. शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे (Thane) शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॅास्पिटल (Thane Civil Hospital) नवीव बनवण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस शिवसेनेतील ही धुसफूस आणि फुट ताजी असताना काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस असल्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या धुसफुसीवर बोट ठेवून कारवाईचा बडगा उचलण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. दिवसभरात NIA चे 17 ठिकाणी छापे अमरावतीचे (Amravati) पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या (Umesh Kolhe Murder Case) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून प्रचंड जलद गतीने तपास सुरु आहे. या प्रकरणाता छडा लावण्यासाठी NIA च्या अधिकाऱ्यांनी सात आरोपींना पकडल्यानंतर काल तब्बल 17 ठिकाणी छापे मारल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीटी उषा यांच्यासह फिल्म कंपोजर आणि संगीतकार इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रानंतर दिल्लीतही 'शिंदें'चं वजन वाढलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, या दोघांचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले आहेत. मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) आणि राम चंद्र प्रसाद सिंग या दोघांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता राज्यात सध्या विविध ठिकाणी जोरदार (Maharashtra Rain) पाऊस होत आहे. सातारा, सांगली कोल्हापूर, मुंबई यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता हवामान खात्याने (IMD on Maharashtra Rain) आणखी इशारा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Monsoon, Shivsena

    पुढील बातम्या