CAB विधेयकावर बोलताना लोकसभेत शिवसेनेने अमित शहांना सुनावलं...

CAB विधेयकावर बोलताना लोकसभेत शिवसेनेने अमित शहांना सुनावलं...

नुसते कायदे करून काहीही फायदा होत नाही. तुम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय केलं. आत्तापर्यंत किती लोकांना बाहेर काढलं हे पहिले सांगा आणि नवीन विधेयक आणा.

  • Share this:

नवी दिल्ली 09 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत आज वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. तर या विधेयकावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शिवसेनेची भूमिका मांडली. तसा हा मुद्दा शिवसेनेसाठी संवेदनशील आहे. मात्र नव्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेने या विधेयकावर वेगळी भूमिका घेत अमित शहांना चांगलंच सुनावलं. हे विधेयक योग्य असलं तरी त्यामागची अमित शहांची भूमिका योग्य नाही. त्यांच्या मनात काहीतरी वेगळच आहे असंही राऊत यांनी सांगत शहांना खडे बोल सुनावले. राऊत म्हणाले, नुसते कायदे करून काहीही फायदा होत नाही. तुम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय केलं. आत्तापर्यंत किती लोकांना बाहेर काढलं हे पहिले सांगा आणि नवीन विधेयक आणा. ज्या समुदायांच्या लोकांना तुम्ही नागरिकत्व देऊ इच्छिता असे किती लोक भारतात आहेत याचा आकडाही तुम्ही देऊ शकला नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न, एकाला अटक

नागरिकत्व देणाऱ्या निर्वासितांना मतदानाचा हक्क देऊ नका अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर भाजपने जोरदार निशाणा साधलाय. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. पण नंतर ते ट्वीट डिलीट केलंय त्यावरून चर्चा सुरू झालीय.

या विधेयकाला शिवसेनेने सशर्त पाठिंबा देत अमित शहा आणि त्यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केलीय. ज्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येणार आहे त्यांना मतदानाचा अधिकार मात्र देऊ नका अशी भूमिका शिवसेनेने घेतलीय. त्यावर आशीष शेलार म्हणाले, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम हिंदुंसाठी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र बाळासाहेबांची शिवसेना आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आहे.

शिवसेना झाली काँग्रेसची हमाल, दे धमाल; भाजप नेत्याचा घणाघात

इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा अधिकार नको? अशी त्यांची भूमिका आहे. सत्तेसाठी पाहा कशी कमाल, काँग्रेसचे हमाल, दे धमाल असं ट्वीट शेलार यांनी केलं होतं. मात्र नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं. शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार किंवा नाही यावर भाजपच्या मनात संभ्रम होता त्यामुळे शेलार यांनी असं ट्वीट केलं होतं. त्यांनी ट्वीट डिलीट केलं तरी त्याचे स्क्रिन शॉट्स आता व्हायरल होत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 9, 2019, 8:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading