जबलपूर, 02 एप्रिल : गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी साईबाबा हे देव नसल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांना विचारण्यात आलं होतं की, साई बाबांची पूजा करायला हवी की नको? यावर धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं की कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह नाही बनू शकत.
धीरेंद्र शास्त्री जबलपूरमध्ये भागवतकथा कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बागेश्वर सरकार दरबारात लोकांशी बोलत होते. तेव्हा साईबाबांविषयी विचारलेल्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींनी साई बाबांना देव मानण्यास नकार दिला. आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलं नाही. शंकराचार्यांचं म्हणणं मान्य करणं बंधनकारक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट ही सनातनींचा धर्म आहे कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणीही संत असेल मग ते आमच्या धर्माचे असले तरी ते देव असू शकत नाहीत असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
एप्रिलमध्ये बुध, गुरू, सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन, 5 राशींना धनलाभाचे योग
धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं की, संत कोणीही असो, तुलसीदास असो, सूरदास असो, हे सगळे संत आहेत. कोणी महापुरुष, कोणी युगपुरुष, कोणी कल्पपुरुष आहेत पण यात देव कुणीही नाही. आम्ही कुणाच्या भावनांना दुखावू शकत नाही पण सांगू शकतो की साई बाबा संत-फकीर असू शकतात, मात्र देव असू शकत नाहीत.
आपल्या विधानावरून वादही सुरू होईल असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आता या वक्तव्यावरून लोक वाद करतील, पण सत्य बोलणं गरजेचं आहे. कोणीही कोल्ह्याची कातडी पांघरून सिंह बनू शकत नाही. शंकराचार्यानीही साईबाबांना देव मानण्यास नकार दिला होता. साई बाबांची पूजा कऱणं चुकीचं आहे. याशिवाय साईबाबांच्या मंदिराचाही शंकराचार्यांनी विरोध केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh