मुंबई, 5 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांनी काल विधानभवनात विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र, सभागृहाबाहेरील शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष अद्याप सुरु आहे. शिवसेना
(Shivsena) कुणाची हा यावरुन हा वाद आहे. आता न्यायालयातच हा वाद मिटेल. दुसरीकडे राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्याच्या काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा.
सावधान! राज्यात सर्वत्र दमदार पावसाचा इशारा
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून विशेषत: कोकण मुंबई, पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्याच्या काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली (Maharashtra Rain update) आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा
विधानसभेच्या आपल्या पहिल्या भाषणातच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Prices) वाढते दर कमी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
कोणावर कारवाई होणार? शिंदे गट की शिवसेना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. तर याबाबतची कायदेशीर लढाईल सुरुच आहे. शिवसेना संपणार नाही. आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटलं.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर
श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला. माझ्या आयुष्यात दुखद प्रसंग आला, माझी दोन मुलं माझ्या समोर गेली. त्यावेळेस मला आनंद दिघे साहेबांनी आधार दिला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm ekanth shinde speech) यांना अश्रू अनावर झाले.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने
समोर आल्यावर बंडखोर आमदार डोळ्यात डोळे घालू बोलू शकणार नाहीत, असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होत. या दरम्यान आज बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले. दोघांनीही हस्तांदोलन केलं. दोघांची भेट आणि संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. मात्र या संभाषणात प्रकाश सुर्वे काहीही बोलू शकले नाहीत.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
व्हीपचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार; आदित्य ठाकरेंचा इशारा
शिवसेना (Shivsena) कुणाची हा प्रश्न अजून कायम आहे. याबाबतची कायदेशीर लढाईल सुरुच आहे. शिवसेना संपणार नाही. आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटलं.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.