मराठी बातम्या /बातम्या /देश /

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, राऊतांनंतर पवार कुटुंब अडचणीत, अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार TOP बातम्या

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, राऊतांनंतर पवार कुटुंब अडचणीत, अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 9 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस (Maharashtra Cabinet Expansion) यांचं सरकार आल्यानंतर 38 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपकडून आतापर्यंत 9 जणांची नावं समोर आली आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शरद पवार यांचं कुटुंबही अडचणीत येण्याची शक्यता आहे. लवासा प्रकरणात त्यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. राऊतांनंतर पवार कुटुंब अडचणीत? काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच आता पवार कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. फडणवीसांचे 9 शिलेदार फिक्स महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 38 दिवसानंतर मुहूर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 10 ते 11 आणि एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) असलेल्या 6-7 मंत्र्यांचे शपथविधी होऊ शकतात. भाजपकडून शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची नावं आता समोर आली आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आशिष शेलार होणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष? आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यानंतर आशिष शेलार यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी चिन्ह आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मविआच्या निर्णयांना स्थगिती सुरुच! सरकार स्थापनेनंतर शिंदे सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक धक्के दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सरकार गेलं तरी धुसफूस! महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांकडे (Ajit Pawar) देण्यात आलं, तर विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) अजूनही रिक्त आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावाची शिफारस केली आहे. यामुळे आघाडीतील काँग्रेस नाराज झाल्याचे समजत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सरकार वाचवण्यासाठी भाजपकडून शेवटचा प्रयत्न महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट फुटला आणि राज्यात भाजपला सत्ता मिळू शकली. इथला आनंद साजरा करीत असतानाच भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युती तुटण्याच्या मार्गावर आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अर्ध्या महाराष्ट्राला 3 दिवसांसाठी मुसळधार इशारा महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. हवामान खात्याकडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. तर अर्ध्या महाराष्ट्राला 3 दिवसांसाठी मुसळधार इशारा देण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ajit pawar, Top news maharashtra

    पुढील बातम्या