मराठी बातम्या /बातम्या /देश /

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा, बिहारमध्ये सरकार कोसळलं TOP बातम्या

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा, बिहारमध्ये सरकार कोसळलं TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 10 ऑगस्ट : सत्ता स्थापन केल्यानंतर 39 दिवसांनी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असताना बिहारमध्ये मात्र भाजप-जडीयूचं सरकार कोसळलं आहे. शिवसेना कोणाची यावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद सुरू आहे. यासंदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाला मोठा दिलासा दिला आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातीही ठरली! सत्ता स्थापन केल्यानंतर 39 दिवसांनी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. राजभवनात झालेल्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या (BJP) 9 तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता कोणाला कोणतं खातं मिळणार? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. कोणाला कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी आता समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिंदेंच्या टीममध्ये एकही महिला मंत्री नाही अखेर 39 दिवसांनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण, या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर नाराजी व्यक्त टीकास्त्र सोडले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. चित्रा वाघ संतापल्या, भाजपला घरचा आहेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया राज्यातील शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सव्वा महिन्यानंतर आज पार पडला. एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. काही नावं टाळता आली असती अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी एबीपी माझाला दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया अखेर 34 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या विस्तारावर आक्षेप नोंदवला आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री, लोढा सगळ्यात श्रीमंत तर भुमरेंची संपत्ती सगळ्यात कमी! सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या 9 तर भाजपच्या (BJP) 9 अशा एकूण 18 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे सगळ्यात श्रीमंत आहेत, तर संदीपान भुमरे यांची संपत्ती सगळ्यात कमी आहे. 18 पैकी 6 मंत्र्यांवर एकही गुन्हा दाखल नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. केंद्रीय निवडणूक आयोगाचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा! शिवसेना कोणाची यावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद सुरू आहे. यासंदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाला मोठा दिलासा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'मिशन 2024'च्या रेसमध्ये शरद पवार पडले मागे? बिहारच्या महागठबंधन सरकारमध्ये काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद घ्यावं, यासाठी नितीश कुमार आग्रही आहेत. याशिवाय नितीश कुमार यांनी युपीएचे कनव्हेनर (UPA Convener) म्हणजेच संयोजक व्हावे, असं काँग्रेसला वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav thacakrey

पुढील बातम्या