27 डिसेंबर : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थितीत होते. यावेळी मोदींनी प्रसिद्ध मॉल रोडवरच्या इंडियन कॉफी हाऊस इथे थांबले आणि काॅफीचा आस्वाद घेतला.
सिमला इथे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहून परतत असतांना पंतप्रधान मोदी अचानक सिमल्याच्या बाजारपेठेतल्या प्रसिद्ध मॉल रोडवरच्या इंडियन कॉफी हाऊस इथे थांबले. लोकसभा निवडणुकांच्या वेळी चाय पे चर्चा करून लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या मोदी यांना थंड वातावरणात गरमागरम कॉफी पिण्याचा मोह आवरता आला नाही.
त्यांनी आपला थाफा थांबवून 'कॉफी हाऊस वालों...काॅफी तो पिलोओ' अशी आॅर्डर दिली. खुद्द पंतप्रधानच आपल्या इथं काॅफी प्याला आल्याचं पाहुन वेटरने तातडीने मोदींना काॅफी आणून दिली.
यावेळी लोकांची खूप गर्दी झाली होती. प्रचंड गर्दीमुळे मोदी यांना दुकानात जाऊन कॉफी पिणं शक्य नव्हतं. त्यामुळे रस्त्यावर उभं राहूनच मोदी यांनी गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला.
साधारण २० वर्षांपूर्वी पक्षाच्या कामाला सिमला इथे आले असता मोदी यांनी याच हॉटेलमधे कॉफी प्यायली होती. यानंतर मोदी यांनी ट्विटरवर इथे कॉफी प्यायल्याची आठवण लिहीली आहे.
In Shimla, relished coffee at the Indian Coffee House and reminisced old days. The coffee tastes as good as it did two decades ago, when I would frequent Himachal for party work. pic.twitter.com/XOYzlpLc43
— Narendra Modi (@narendramodi) December 27, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा