• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • शिमलामध्ये टोन्स नदीत बस कोसळून 44 प्रवाशांचा मृत्यू

शिमलामध्ये टोन्स नदीत बस कोसळून 44 प्रवाशांचा मृत्यू

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

  • Share this:
19 एप्रिल : हिमाचल प्रदेशातील शिमला इथल्या टोन्स नदीत बस कोसळून आज भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 44 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. पण मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिमला जिल्ह्यात टोन्स नदी आहे. ही बस सकाळी 8-9 वाजण्याच्या सुमारास उत्तराखंडहून शिमल्याला  जात होती, त्यावेळी ही घटना घडली. बसमध्ये 50 हून अधिक प्रवाशी होते, अशी माहिती मिळते आहे. यातील 44 प्रवाशांचा नदीत बुडून मृत्यू झाला असून, यातील काही जण नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी संबंधित प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.
First published: