नवी दिल्ली, 5 जुलै : फळांचा राजा आंबा पुन्हा एकदा (Mango) राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. आंबा एक असा प्रतिक होऊन राजकारणात आला आहे की, ज्या माध्यमातून दोन विरोधकांमधील कडवटपणादेखील दूर होऊ शकेल. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी भेट म्हणून गोड आणि रसदार आंबा पाठवला आहे. शेख हसीना यांनी दोन्ही नेत्यांना 2600 किलो आंबे पाठवले आहेत.
हे आंबे बांगलादेशाच्या बेनापोल चेकपॉइंटच्या मार्गाने भारतात आणण्यात आले आहेत. शेख हसीना यांच्याकडून पाठविलेले हरिभंगा जातीच्या आंब्याच उत्पादन रंपुर भागात घेतलं जातं. रविवारी बांगलादेशातून ट्रकमधून 260 आंब्याच्या पेट्या भारतात आणण्यात आल्या. बेनापोस्ट कस्टम्स हाउसचे डेप्युटी कमिश्नर अनुपम चकना यांनी बांगलादेशातील मीडियाशी बोलताना सांगितलं की, हे आंबे दोन्ही देशांमध्ये सौदार्हाचं प्रतीक आहे. आंबे सीमापार घेऊन जाताना बांगलादेशातील अनेक अधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौरा केला होता. त्यानंतर आता ही त्या दौऱ्याची फळं असल्याचं म्हटलं जात आहे.
हे ही वाचा-मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात, ठरला 'हा' मुहूर्त ?
भारतातील राज्यांनाही आंबे पाठवण्याची व्यक्त केली इच्छा
भारताकडून ही आंब्याची भेट कलकत्तामधील बांगलादेशाचे डेप्युटी हाय कमिशनचे फर्स्ट सेक्रेटरी मोहम्मद समिअर कादर यांनी स्वीकारलं आहे. पीएम मोदी आणि सीएम ममता बॅनर्जी यांना आंब्याची भेट पाठविण्यात आली आहे. बांगलादेशातील मीडियानुसार, शेख हसीना या बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांना आंबे पाठवू इच्छिते. हे आंबे बांगलादेशात अतिशय प्रसिद्ध असून यामुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागल्याचं सांगितलं जात आहे.
जुलैच्या शेवटपर्यंत आंब्यांच्या किमती गगनाला भिडतात
हे आंबे जूनच्या शेवटच्या आठवड्यात काढायला सुरुवात करतात. सुरुवातीला याच्या किंमती फार नसतात. मात्र सीजन संपताना या किंमती बऱ्याच पटीने वाढतात. सुरुवातील 60 ते 80 टक्के प्रती किलोपर्यंत विकणारे आंबे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 300 ते 500 टक्के प्रति किलोने विकले जातात. प्रत्येक वर्षी आंब्यांचा व्यवसाय शेकडो कोटींपर्यंत पोहोचतो. गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षी कोरोना महासाथीमुळे आंब्याच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.