हत्येच्या 6 महिन्यांनंतरही जिवंत होती शीना बोरा, इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

हत्येच्या 6 महिन्यांनंतरही जिवंत होती शीना बोरा, इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

शीना बोरा ते सहा महिने तिचा होणारा पती राहुल मुखर्जी याच्यासोबत राहत होती

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : शीना बोरा हत्येची आरोपी (Sheena Bora Murder) इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) यांनी विशेष सीबीआय कोर्टात (CBI Court) सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. इंद्राणी मुखर्जींने दावा केला आहे, की 24 एप्रिल 2012 रोजी जेव्हा शीनाच्या हत्यबाबत सांगण्यात आलं, त्यानंतर तब्बल 6 महिने शीना जिवंत होती. इंद्राणीने दावा केला आहे की, शीनाच्या हत्येची जी तारीख सांगितली जात आहे त्यानंतरही पुढील 6 महिने ती आपला होणारा नवरा राहुल मुखर्जी याच्यासोबत राहत होती. विशेष सीबीआय कोर्टात मंगळवारी पाचव्यांदा इंद्राणीच्या जामीनाच्या याचिकेवर सुनावणी झाली.

या प्रकरणातील सुनावणीदरम्यान इंद्राणीने कोर्टात राहुल मुखर्जीच्या कॉल डेटा रेकॉर्डचा हवाला देत सांगितले, की दोघांमध्ये 27 पासून ते 28 डिसेंबरपर्यंत बातचीत सुरू होती. इंद्राणीने कोर्टात तीन दिवसांपर्यंत राहुल आणि शीनामध्ये झालेला संवाद वाचून दाखविला. इंद्राणीने सांगितले की, राहुल मुखर्जी यांनी लिहिले होते, की ‘मी कार पार्किंगमध्ये आहे, इकडे ये’. यावर शीनाने प्रतिक्रिया दिली – ‘5 मिनिट बस्स’. यानंतर राहुलने आणखी एक मेसेज केला- ‘चल लवकर’.

कोर्टात जामीन याचिकेवर सुनावणी करताना इंद्राणी मुखर्जीने सांगितले, की 'मला जाणूनबुजून फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी निर्दोष आहे'. इंद्राणी पुढे जाऊन म्हणाली की, ऑगस्ट 2015 मध्ये तिला अटक केल्यानंतर तातडीने पीटर मुखर्जीने आपला मुलगा राहुल आणि रबिना यांच्या खात्यात 6 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. इंद्राणीने कोर्टाला सांगितले की एप्रिल 2012 मध्ये कथित हत्येनंतर 2015 साली तिच्या अटकेपर्यंत 19 वेळा मी परदेश दौरा केला आहे. जर मी असं काही कृत्य केलं असतं तर मी पुन्हा कशाला आले असते?

पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

हेही वाचा -‘हे ते उद्धव ठाकरे नव्हेत...काहीतरी गडबड आहे’

मित्रांनी whatsapp वर ब्लॉक केलं म्हणून तरुणाची आत्महत्या, मुंबईतली घटना

शीना बोरा हत्याकांडात गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पीटर मुखर्जी याला मुंबई उच्च न्यायालयाने 6 फेब्रुवारी रोजी जामीन दिला आहे. त्याच्या जामीनानंतर लगेचच सीबीआयने कोर्टाकडून या प्रकरणात स्टेची मागणी केली. सीबीआयकडून सांगण्यात आले की, हे प्रकरण गंभीर आहे. कोर्टाने साबीआयचे ऐकले आणि आपल्याच ऑर्डरवर 6 आठवड्यांचा स्टे लावला आहे.

First published: February 26, 2020, 12:55 PM IST

ताज्या बातम्या