'एक पाँव रखता हु, हजार राहे फुट पडती है'

'एक पाँव रखता हु, हजार राहे फुट पडती है'

भाषण संपल्यावर सत्ताधारी बाकावरच्या अनेक खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या आसनाकडे धाव घेतली. तर पंतप्रधानांनीही त्यांना मनमोकळं हसून प्रतिसाद दिला.

  • Share this:

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : अर्थमंत्री पियूष गोयल यांनी मोदी सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका जवळ आल्याने अपेक्षेप्रमाणे त्यात घोषणांचा पाऊस आणि सवलतींचा वर्षाव होता. कवितेची एक ओळ सोडली तर अर्थमंत्र्यांनी पूर्ण भाषणात कुठेही कविता किंवा शेरो शायरीचा वापर केला नाही. तरीही त्यांनी भाषण रटाळ होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली.


गोयल यांनी भाषणाच्या शेवटी हिंदीच्या कवितेची एक ओळ वापरली. ते म्हणाले, " माझं राज्य असलेल्या महाराष्ट्रात राहणारे हिंदीचे एक कवी आहेत. त्यांची फक्त एक ओळ मला या प्रसंगी सांगावीसी वाटते. ती ओळ आहे 'एक पाँव रखता हु, हजार राहे फुट पडती है'."


मी एक पाऊल पुढे टाकलं तर हजार वाटा निर्माण होतात असा त्याचा अर्थ होते. सकारात्मक विचाराच्या या ओळी सांगून त्यांनी नवा आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गोयल यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोनही भाषेत दीड तासांपेक्षा जास्त काळ भाषण केलं.


गोयल ही कविता सादर करत असतानाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही मी कविता म्हणून दाखवू शकतो असं सांगितलं. पण गोयल यांच्या शेजारी बसलेल्या नितीन गडकरींनी त्यांना शांत केलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेडफोन लावून गोयल यांचं सर्व भाषण लक्षपूर्वक ऐकलं. जेव्हा जेव्हा सवलती आणि घोषणांचा उल्लेख होत असे तेव्हा तेव्हा इतर खासदारांप्रमाणेच तेही जोरात बाकं वाजवून त्याचं स्वागत करत होते.


आयकराची घोषणा होताच भाजपच्या खासदारांनी मोदींच्या नावाने घोषणा करुन सभागृह दणाणून सोडलं. तर त्याच वेळी काँग्रेसच्या बाकावर बसलेल्या नेत्यांच्या चेहेऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शांतपणे भाषण ऐकत होते.


भाषण संपल्यावर सत्ताधारी बाकावरच्या अनेक खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या आसनाकडे धाव घेतली. तर पंतप्रधानांनीही त्यांना मनमोकळं हसून प्रतिसाद दिला.

Union Budget 2019 : आयकराची घोषणा होताच मोदींच्या नावाने दणाणलं सभागृह; पहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या