Home /News /national /

नेपाळी नागरिकाचं मुंडन करुन लिहिलं ‘जय श्रीराम’; पीएम ओलींच्या वक्तव्यावर VHP कार्यकर्ते भडकले

नेपाळी नागरिकाचं मुंडन करुन लिहिलं ‘जय श्रीराम’; पीएम ओलींच्या वक्तव्यावर VHP कार्यकर्ते भडकले

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानांना इशारा दिला आहे.

    वाराणसी, 16 जुलै : काही दिवसांपूर्वी नेपाळचे पीएम ओली यांनी अयोध्यासंदर्भात धक्कादायक वक्तव्य केलं होते. बवारसमध्ये राहणारे नेपाली नागरिकाचे बुधवारी जबरदस्तीने मुंडन करण्यात आले. त्या नेपाली नागरिकाच्या डोक्यावर जय श्रीराम लिहिण्यात आलं. त्याला नेपाली पंतप्रधान मुर्दाबादची घोषणा लावण्यास सांगण्यात आलं. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्र वाराणसीत घडली असून विश्व हिंदू सेनाने हे पाऊल उचललं आहे. विश्व हिंदू सेनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला असून नेपाळचे पीएम केपी शर्मा ओली यांना इशारा दिला आहे. सोबतच बनारसमध्ये राहणाऱ्या नेपाळी नागरिकांनाही इशारा दिला आहे. जर नेपाळचे पीएम सातत्याने अशा पद्धतीची वक्तव्य करीत राहतील तर याचा परिणाम भोगावा लागेल. हे वाचा-चीनचं कंबरड मोडलं; टिकटॉकनंतर मोदी सरकारने यावरही आणली बंदी विश्व हिंदू सेनाने फोटो केले व्हायरल विश्व हिंदू सेनाने आज सोशल मीडियावर एक फोटो जारी केलं आहे. ज्यामध्ये पशुपतिनाथ मंदिराच्या प्रांगणात हे पोस्टर चिटकवण्यात आलं आहे. यात लिहिले आहे की – नेपाळचे पीएम ओली यांनी भगवान श्रीराम यांच्याविषयी केलेलं वक्तव्य मागे घ्यावं. अन्य़था नेपाळी नागरिकांना याचा परिणाम भोगावा लागेल. विश्व हिंदू परिषदेचे संरक्षण अरुण पाठक यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं कृत्य योग्य असल्याचे सांगितले. आपल्या देवांविषयी वक्तव्य केल्यास सहन केलं जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Varanasi

    पुढील बातम्या