शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेस प्रवेश, त्यांच्या निर्णयावर सोनाक्षी म्हणते...

शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेस प्रवेश, त्यांच्या निर्णयावर सोनाक्षी म्हणते...

भाजप नेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मार्च : भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते आणि खासदार अभिनेते सिन्हा शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत 6 एप्रिलला त्यांची औपचारिक घोषणा होणार आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजपमधून काँग्रेस प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटले की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.  मला असं वाटतं की जर तुम्ही आनंदी नसाल तर बदल केला पाहिजे आणि त्यांनी तेच केलं.

आता ते काँग्रेससोबत चांगल काम करतील आणि एका बाजूला पडणार नाहीत अशी आशा वाटते असं सोनाक्षीने म्हटलं आहे. ती म्हणाली की, जयप्रकाश नारायण, अटलजी, आडवाणी यांच्या काळापासून पक्षात असल्याने त्यांना मान आहे. पण मला वाटतं की त्यांच्या गटाला पक्षाकडून योग्य ते अधिकार दिले नाहीत. त्यांनी हा निर्णय घेण्यास उशिर केला.भाजपने पटनासाहिब इथून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज होते. यामुळेच त्यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर पक्षांची मोट बांधून महागठबंधनला एकत्र ठेवण्यात शत्रुघ्न सिन्हा यांची महत्त्वाची भूमिका आहे, असं बोललं जातं. भाजपमधून काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल ते म्हणाले की, मी पक्ष सोडला नाही तर पक्षाने मला सोडलं. माझं म्हणणं पक्षाला नेहमीच चुकीचं वाटलं. मी जे होतं ते मांडत होतो.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चेनंतर शत्रुघ्न सिंन्हा यांनी राहुल यांचे कौतुक केले होते. राहुल गांधी वयाने लहान असले तर देशाचे तरुण आणि लाडके नेते असल्याचे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते. मी गांधी-नेहरु परिवाराचा समर्थक असून देशाच्या उभारणीत त्यांचे योगदान असल्याचं मानतो असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

गेल्या वर्षभरापासून ते सातत्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. 2014 च्या निवडणुकीनंतर आपल्याला मंत्रिमंडळात जागा मिळावी अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांचा समावेश न झाल्याने ते नाराज झाले होते.

<strong>माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? काय म्हणाले पार्थ पवार</strong>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 10:09 AM IST

ताज्या बातम्या