भाजपनंतर आता काँग्रेसचा शत्रू, जीन्नांबद्दलच्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत

भाजपनंतर आता काँग्रेसचा शत्रू, जीन्नांबद्दलच्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जीन्ना यांच्याबदद्ल केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. 'मोहम्मद अली जीन्ना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक आहेत आणि महात्मा गांधी ते मोहम्मद अली जीन्ना या नेत्यांचा काँग्रेस परिवार आहे', असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 एप्रिल : भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जीन्ना यांच्याबदद्ल केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. 'मोहम्मद अली जीन्ना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक आहेत आणि महात्मा गांधी ते मोहम्मद अली जीन्ना या नेत्यांचा काँग्रेस परिवार आहे', असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

जीन्ना की मौलाना आझाद ?

आता मात्र आपण जीन्ना यांचं नाव चुकून घेतलं, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. मला मौलाना आझाद असं म्हणायचं होतं पण मी चुकून मोहम्मद अली जीन्ना असं म्हणालो, असं स्षष्टीकरण शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलं.

शत्रुघ्न सिन्हा हे पटनासाहिब मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी आहे.

मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जीन्ना यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं होतं. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधी यांच्यापासून ते सरदार पटेल, मोहम्मद अली जीना या दिग्गज नेत्यांचा पक्ष आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांच्यापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत सगळ्यांचाच हा पक्ष आहे, असं ते म्हणाले होते.

भाजपची टीका

शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यावरून बिहारमध्ये चांगलंच राजकारण पेटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. बिहारमधले लोक मोहम्मद अली जीना यांचं समर्थन कधीही करणार नाहीत. शत्रुघ्न सिन्हा यांनी जीन्ना यांच्याबदद्ल हे वक्तव्य करून देशातल्या कोट्यवधी हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.

काय म्हणाले चिदंबरम ?

शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची जी काही मतं असतील ती त्यांनी स्पष्ट करावीत. पण काही दिवसांपूर्वी ते भाजपमध्ये होते. त्यामुळे ते इतकी वर्षं भाजपमध्ये कसे काय होते हे भाजपने सांगावं, असं पी. चिदंबरम म्हणाले. काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण मी देत बसणार नाही. मी फक्त माझ्या पक्षाची अधिकृत भूमिका सांगू शकतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

==========================================================================

VIDEO: मोहम्मद जीन्ना काँग्रेसचे- शत्रुघ्न सिन्हा

First published: April 27, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या