नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहलं आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्याला देशद्रोह म्हणणं आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. झुंडबळीच्या घटनांनंतर इतिहासकार रामचंद्र गुहा, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह अनेकांनी सरकारला पत्र लिहणाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांवरून शशी थरूर यांनी ट्वीटरवर पत्र लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या पत्रात शशी थरूर म्हणतात की, मन की बात मौन की बात होऊ नये यासाठी तरी तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन कराल. मोदींच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत थरूर यांनी म्हटलं की, तुम्ही 2016 मध्ये अमेरिकेतील कार्यक्रमात भारताचे संविधान पवित्र असल्याचं सांगितलं होतं. तसेच संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, भाषण आणि समानतेचे अधिकार दिले आहेत असंही सांगितले होते. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि सरकारने त्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतील अशी अपेक्षा करत आहेत.सध्या सरकाविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना देशद्रोही मानलं जात आहे. मात्र असं केल्यानं लोकशाही मजबूत होणार नाही.
Urging all those who believe in #FreedomOfExpression to send this or similar letters to @PMOIndia @narendramodi urging him to affirm the constitutional principle of our Article 19 rights & the value of democratic dissent — even if more FIRs follow as a result! #SaveFreeSpeech pic.twitter.com/MDIrros64j
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 8, 2019
भारताचे नागरिक म्हणून आमची इच्छा आहे की, कोणत्याही भीतीशिवाय देशाबद्दल आम्हाला बोलता यावं. आमचं म्हणणं तुमच्या पर्यंत पोहचावं आणि त्यावर तुम्हाला निर्णय घेता यावा. आम्हाला अपेक्षा आहे की ही 'मन की बात' 'मौन की बात' होऊ नये यासाठी तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन कराल असंही शशी थरूर यांनी पत्रात म्हटलं आहे.
जुलै महिन्यात देशातील काही लेख, चित्रपट निर्माते आणि इतर मान्यवरांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहलं होतं. मॉब लिंचिंगच्या घटनांवर चिंता व्यक्त करणाऱं पत्र लिहल्यानंतर तब्बल 50 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा