Home /News /national /

चेतन भगतच्या विनंतीवरुन शशी थरूर यांनी लिहिलं अस्सं इंग्रजी; डिक्शनरी उघडल्याशिवाय कळणं अवघड

चेतन भगतच्या विनंतीवरुन शशी थरूर यांनी लिहिलं अस्सं इंग्रजी; डिक्शनरी उघडल्याशिवाय कळणं अवघड

शशी थरूर यांचं ट्विट समजून घेण्यासाठी डिक्शनरीच उघडावी लागेल..

    नवी दिल्‍ली, 14 सप्टेंबर : काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांचं इंग्र प्रभूत्व पाहून सारेजण अचंबित होतात. ते आपल्या भाषणात आणि अनेकदा सोशल मीडिया पोस्टमध्ये इतक्या उच्च दर्जाच्या इंग्रजीचा वापर करतात की अनेकांना त्यांचं कौतुक वाटतं. यापैकी अनेक शब्द तर ऐकिवातही नसलेले असे असतात. पुन्हा एकदा शशी थरूर यांची अशीच प्रभावी इंग्रजी पाहायला मिळाली. रविवारी लेखक लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांचा एक लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. हा लेख अर्थव्यवस्था आणि तरुणांशी संबंधित होता. या लेखावरुन शशी थरूर यांनी चेतन भगत यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर चेतन भगत यांनाही टॅग केलं. यावेळी थरूर यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये साधारण इंग्रजी भाषेचा वापर केला होता. यावेळी चेतन भगतने त्यांचं ट्विट रिट्विट करीत माझ्या कामाचं तुम्ही कौतुक केलं, यावर विश्वास नसल्याची भावना व्यक्त केली. यानंतर त्यांनी शशी थरूर यांच्यासाठी लिहिले की, माझी विनंती आहे की यापुढे तुम्ही माझ्या कामाचं कौतुक कराल, तर इंग्रजीतील मोठ्या शब्दांचा वापर करा..जो केवळ तुम्हीच करू शकता. Superb तर ठीक आहे मात्र तुम्ही दिलेला एखादा मोठा शब्द माझं दिवस चांगला करेल. चेतन भगत यांच्या आग्रहानंतर शशी थरूर यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांनी ट्विट करीत अनेक मोठ्या व कधीही न ऐकलेल्या शब्दांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी लिहिले की, चेतन यांनी आपल्या लेखनात कठीण वा अवघड पद्धतीचा वापर केलेला नाही. याशिवाय त्यांनी आपल्या लेखात सरळ आणि स्पष्ट पद्धतीचा अवलंब केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या