शशी थरूर यांचा इंग्रजीत 'राडा'; युजर्स म्हणतात, कहना क्या चाहते हो?

शशी थरूर यांचा इंग्रजीत 'राडा'; युजर्स म्हणतात, कहना क्या चाहते हो?

काँग्रेस नेते यांनी त्यांच्या ट्विटमध्ये Kerfuffle शब्द वापरला असून आता त्याचा अर्थ शोधला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशि थरूर गेल्या दोन आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यामुळं चर्चेत आले होते. सोशल मीडियावरही थरूर सक्रीय असतात. अनेकदा ते असे काही इंग्रजी शब्द वापरतात की शब्दकोष समोर घेऊन बसावा लागतो. नुकतंच त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर नव्या शब्दाचा शोध सुरू झाला आहे.

शशी थरूर मालदीवला सुट्टीनिमित्त गेले होते. तिथले फोटो शेअर करताना त्यांनी 'kerfuffle' या इंग्रजी शब्दाचा वापर केला आहे. इंग्रजीतील अशा कठीण शब्दांचा वापर करण्याची त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही lalochezia, farrago, webaqoof आणि snollygoster यांसारख्या शब्दांचा वापर केला आहे.

थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, दोनएक आठवड्यांपूर्वी जेव्हा संपूर्ण माध्यमं राजकीय राडा किंवा गोंधळ (Political Kerfuffle) कव्हर करण्यात बिझी होती तेव्हा मी काही काळ मालदीवमध्ये होतो. असं वाटत आहे की या अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणी आहेत.

ट्विटमधील कठीण शब्दावरून युजर्सनी त्यांची फिरकीसुद्धा घेतली आहे. त्याचबरोबर सोपे शब्द वापरत जा असंही सांगितलं. तुमचे भाषण आणि मेसेज वाचल्यानंतर अनेकांचा एकच प्रश्न असतो तो म्हणजे आखिर कहना क्या चाहते हो.

शशी थरूर यांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ एका ट्विटर युजरनं पोस्ट केला आहे.

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या