VIDEO : बापाच्या आधी मुलाचा जन्म कसं शक्य? PM मोदी राष्ट्रपिता या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर शशी थरूरांचा प्रश्न

VIDEO : बापाच्या आधी मुलाचा जन्म कसं शक्य? PM मोदी राष्ट्रपिता या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर शशी थरूरांचा प्रश्न

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपिता असं म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता असं म्हटल्यानं अनेक वाद निर्माण झाले. याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मोदींवर निशाणा साधला. वडिलांच्या जन्माआधी मुलगा कसा जन्म घेऊ शकतो असं म्हणत त्यांनी मोदी कसे राष्ट्रपिता होऊ शकतात असं म्हटलं आहे.

शशी थरूर म्हणाले की, गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा प्रश्न विचारत आहात. तुम्हा सर्वांना माहिती आहे देशाचे राष्ट्रपिता कोण आहेत आणि त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. बहुतेक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती नसावं की, स्वतंत्र भारताची निर्मिती 1947 मध्ये झाली आणि नरेंद्र मोदींचा जन्म 1949 कि 1950 मध्ये झाला. यामुळे बापाचा जन्म नंतर आणि मुलाचा जन्म आधी हे शक्य नाही. म्हणूनच मोदींना राष्ट्रपिता म्हणणं अजीबच असंही थरूर म्हणाले.

दरम्यान, काश्मीर मुद्यावर मोदी सरकारचे शशी थरूर यांनी कौतुकही केलं होतं. काश्मीर प्रश्नावर इतर कोणाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. तसेच पाकिस्तानशी चर्चेसाठी कोणतीच अडचण नाही. मात्र, ते एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात बॉम्ब घेणार असतील तर थोडं कठीण आहे. पाकने दहशतवाद्यांना आसरा देणं बंद केलं तर चर्चा शक्य आहे असंही ते म्हणाले.

काश्मीर प्रश्नावर भारत-पाक यांच्यात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. याबद्दल मोदींनी हा मुद्दा दोन्ही देशांमधील असून तिसऱ्या देशानं यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 10:32 AM IST

ताज्या बातम्या