PM मोदींना टोला मारण्यास गेलेले शशी थरुर फसले; पाहा काय करून बसले!

PM मोदींना टोला मारण्यास गेलेले शशी थरुर फसले; पाहा काय करून बसले!

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी सोशल मीडियावर एक मोठी चुक केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: सर्व साधारणपणे राजकीय नेते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येतात. पण काँग्रेसचे एक खासदार असे आहेत जे त्यांच्या ट्विटमुळे नेहमची चर्चेत असतात. ट्विटवर जड शब्द वापरणारे काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor)अनेक वेळा सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या चुका सांगत असतात. आता खुद्द शशी थरुर यांनीच एक मोठी चुक केली आहे. या चुकीमुळे नेटिझन्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

शशी थरुर यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Nehru)आणि इंदिरा गांधी (Indira Gandhi)यांचे एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहले की, हा 1954मधील अमेरिकेतील फोटो आहे. फोटोत दिसत आहे की लोकांनी किती शानदार स्वागत केले आहे. या गर्दीला गोळा करण्यासाठी कोणत्याही स्पेशल पीआर कॅम्पेनची गरज पडली नव्हती.

थरुर यांना या फोटोच्या माध्यमातून नुकत्याच पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील कार्यक्रमावर टीका करायची होती. पण मोदींवर टीका करायला गेलेल्या थरुर यांनी फोटो शेअर करताना एक, दोन नव्हे तर तीन चुका केल्या आणि त्यावर युझर्सनी त्यांना टोल करण्यास सुरुवात केली.

थरुर यांनी केलेली पहिली चूक म्हणजे जो फोटो त्यांनी शेअर केला तो मुळात अमेरिकेतील नाही. नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा हा फोटो रशियातील आहे. दुसरे म्हणजे हा फोटो 1954 सालचा नव्हे तर 1956 मधील आहे. जेव्हा पंतप्रधान नेहरुंसोबत इंदिरा गांधी गेल्या होत्या आणि तिसरी व मोठी चूक म्हणजे थरुर यांनी इंदिरा गांधी यांचे नाव लिहिताना India गांधी असे लिहले.

सोशल मीडियावर थरुर यांनी केलेल्या चूका व्हायरल होऊ लागल्यावर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. मला हा फोटो कोणी तरी फॉरवर्ड केला होता. कदाचित हा फोटो अमेरिकेतील असावा. जे काहीही असो हे कोणी नाकारू शकत नाही की, माजी पंतप्रधान यांची लोकप्रियता किती होती.

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 12:12 PM IST

ताज्या बातम्या