'प्रियंका गांधीच काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य उमेदवार'

'प्रियंका गांधीच काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य उमेदवार'

'राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यामुळेही पक्षाचं मोठं नुकसान झालं. त्यांचं मन वळविण्याचा जास्त आग्रह नको.'

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जुलै : राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेली गोंधळाची स्थिती संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेसचे अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. काँग्रेसची सध्या जी स्थिती आहे ती सावरण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि प्रियंका गांधी ते नेतृत्व देऊ शकतात असं मत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केलंय. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या वक्तव्याचंही त्यांनी समर्थन केलं. काँग्रेसच्या अध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी दिली पाहिजे असं सिंग यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यामुळेही पक्षाचं मोठं नुकसान झालं असंही ते म्हणाले. या प्रश्नावर तातडीने निर्णय व्हायला पाहिजे होता असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

भावाने बहिणीला 'किस' केलं म्हणजे सेक्स होतो का? बिहारच्या नेत्याचं बेताल वक्तव्य

या आधीही पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंह यांनी राहुल गांधी यांच्या इच्छेचा आदर करा. त्यांचं मन वळविण्याचा जास्त आग्रह करू नका असं म्हटलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री करणसिंह यांनी एक पत्र लिहून या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर तातडीने नव्या अध्यक्षांची नियुक्ती व्हायला पाहिजे होती. मात्र त्यांचं मन वळविण्यात अनेक दिवस वाया घालविण्यात आले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पराभवाच्या भीतीमुळे प्रणिती शिंदे बदलणार मतदारसंघ? पाहा SPECIAL REPORT

करणसिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन धाडसी निर्णय घेतलाय. त्यांच्या निर्णयाचा सन्मान करायला पाहिजे होता. मात्र असं न करता त्यांचं मन वळविण्यात पक्षाने आपला वेळ वाया घातला. आता वेळीच जागे होत निर्णय घेतला पाहिजे. सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन हंगामी अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांची किंवा उपाध्यक्षांची नियुक्ती केली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

लोकसभेतल्या पराभवानंतर 25 मे रोजी राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्ष आणखीच भरकटल्याचं दिसून येत आहे असंही करणसिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2019 10:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading