दिल्ली, 10 फेब्रुवारी : काँग्रेसचे खासदार शशी थरुर ट्विटरवर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते डिक्शनरीतही सापडणार नाही असा शब्द वापरतात तर कधी त्यांची अस्खलित इंग्रजीमधली कॉमेंट व्हायरल होते. सध्या मात्र शशी थरुर एका वेगळ्याच कारणामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलेत.
नुकताच एका ट्विटर युजरने शशी थरुर यांचा एक झूम केलेला फोटो शेअर केला आणि हे कुठलं यंत्र आहे, असं त्यांना विचारलं. शशी थरुर यांच्या गळ्यात मायक्रोफोनसारखं एक यंत्र आहे. त्या यंत्राबद्दलच या युजरला विचारायचं होतं. त्यावर अनेकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले.
An air purifier (negative ioniser). Delhi’s air is pretty unbreathable. I don’t need it in Thiruvananthapuram.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 7, 2020
यावर काही नेटकऱ्य़ांनी लिहिलं, ही डिक्शनरी असेल. काहीजण म्हणाले, हे GPS असेल. काहीजणांनी तर हे श्रवणयंत्र आहे का, असंही विचारलं.
What is this Device Tharoorji? @ShashiTharoor pic.twitter.com/CDUyqxeNF5
— MATTS (@MATTSMATTS) February 7, 2020
त्यावर शशी थरुर यांनी उत्तर दिलंय, हे एक हवा शुद्ध करणारं उपकरण आहे. ते मी दिल्लीत वापरतो पण थिरुवनंतपुरममध्ये नाही. कारण तिथली हवा दिल्लीसारखी प्रदूषित नाही.
तुम्ही धूम्रपान करता का, असंही काहीजणांनी विचारलं. त्यावर शशी थरुर म्हणाले, नाही. मी कधी तसा प्रयत्नही केला नाही. शशी थरुर यांच्या या हवा शुद्धीकरणाच्या उपकरणामुळे नेटकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारून हैराण केलं.
===================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shashi tharoor, Twitter