कोण आहे भारतापासून आसाम वेगळं करण्याची भाषा करणारा शरजील?

कोण आहे भारतापासून आसाम वेगळं करण्याची भाषा करणारा शरजील?

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शरजील इमाम नावाची व्यक्ती भारतापासून आसाम वेगळं करण्याची भाषा करताना दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जानेवारी : भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शरजील इमाम नावाची व्यक्ती भारतापासून आसाम वेगळं करण्याची भाषा करताना दिसत आहे. संबित पात्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, मित्रांना शाहीन बागचं सत्य बघा.

संबित पात्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शरजील इमाम म्हणतो की, आसाम आणि भारत वेगवेगळे होतील तेव्हाच ते आमचं म्हणणं ऐकून घेतील. आसाममध्ये मुसलमानांची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तिथं एनआरसी लागू करण्यात आळा आहे. मुस्लिमांना डिटेंशन कँपमध्ये नेलं जात आहे. 6-8 महिन्यात समजेल की सगळ्या बंगाली लोकांना मारलं आहे. जर आम्हाला आसामची मदत करायची असेल तर आसामचा रस्ता बंद करावा लागेल.

मूळचा बिहारचा असलेला शरजील इमाम आयआयटी मुंबई इथून कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. शरजील इमामनं तिथं काही काळ शिकवण्याचंही काम केलं आहे. ग्रॅज्युएशननंतर दोन वर्षे बेंगळुरूत एका सॉफ्टवेअर कंपनीत तो डेव्हलपर म्हणून काम करत होता. त्यानतंर 2013 मध्ये जेएनयूमध्ये आधुनिक इतिहासात त्याने मास्टर्ससाठी प्रवेश घेतला. त्यानंतर एमफील आणि पीएचडीसुद्धा केली.

शरजील आयसामध्ये दोन वर्षांहून जास्त वेळ राहिला. त्यात एक वर्ष कार्यकारिणीचा सदस्यही होता. तसेच त्याने कौन्सिलर पदासाठी 2015 मध्ये जेएनयुची निवडणूकही त्याने लढवली होती.

वाचा : सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार, सरकारनं मान्य केल्या 3 अटी

शाहीन बागेत होत असलेल्या धरणे आंदोलनाचा मुख्य आयोजक शरजील होता असं सांगितलं जात आहे. तो सोशल मीडियावरून यात लोकांना सहभागी होण्यासाठी अपील करत होता. तसेच गेल्यावर्षी राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याने Justice Denied नावाने मोहिमही सुरू केली होती.

26 जानेवारीला येणाऱ्या 'वादग्रस्त' पाहुण्यांना होतोय विरोध

First published: January 25, 2020, 9:21 PM IST
Tags: assamNRC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading