जिओ मोबाईलच्या घोषणेमुळे टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स घसरले

जिओ मोबाईलच्या घोषणेमुळे टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स घसरले

भारती एयरटेलचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले आहेत तर आयडियाचे शेअर्स 6.5 टक्क्यांनी घसरले आहेत

  • Share this:

21 जुलै: रिलायन्स इंडस्ट्रीजने वार्षिक सर्वसाधारण सभेत फ्री स्मार्टफोनची घोषणा केल्यानंतर बाकीच्या टेलिकॉम कंपन्यांनवर या निर्णयाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

टेलीकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येते आहे.

भारती एयरटेलचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले आहेत तर आयडियाचे शेअर्स 6.5 टक्क्यांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे जिओचे शेअर्स मात्र 2 टक्कयांनी वाढले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जिओचे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही इन्डेक्स शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

आपल्या वार्षिक साधारण सभेत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी यांनी फ्री जिओ स्मार्टफोनची घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपासून या जिओ फोनवर अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. 153 रूपयात महिनाभर अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. अशा अनेक आकर्षक ऑफर्सची घोषणा जिओने केली आहे.

First published: July 21, 2017, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading