नवी दिल्ली, 23 मे : संपूर्ण देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढतो आहे. अशात सरकार लसीकरण (Corona Vaccination) वेगात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारकडून सर्वांना कोरोना लस घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. वॅक्सिनेशन ड्राईव्हला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने, लस घेणाऱ्या लोकांना त्यांचा लसीकरणावेळीचा फोटो शेअर करण्याचं सांगितलं असून 5000 रुपये जिंकण्याची संधी असल्याचं एक ट्विट केलं आहे.
केंद्र सरकारने वॅक्सिनेशन फोटो शेअर करण्याच्या स्पर्धेची सुरुवात एप्रिलमध्ये केली होती. अधिकाधिक लोकांनी लसीकरण करावं यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचा लसीकरणाचा फोटो शेअर करावा लागेल. आणि त्यानंतर तुमच्याकडे 5000 रुपये जिंकण्याची संधी असल्याचं म्हटलं आहे.
असा घ्या स्पर्धेत भाग -
My Gov India ने ट्विटरवर याबाबत एक लिंक शेअर केली आहे. https://bit.ly/34h2CRT या अधिकृत वेबसाईटवर तुमचा फोटो शेअर करू शकता. अधिकृत वेबसाईटवर कॉन्टेस्ट पर्यायात आवश्यक माहिती भरा आणि तुमची एन्ट्री सबमिट करा. त्यानंतर सरकारकडून बेस्ट एन्ट्रीची निवड केली जाईल.
Recently took the #COVIDVaccine? Here's your chance to inspire millions to get #vaccinated too! Share your vaccination picture with an interesting tagline & stand a chance to win ₹5,000! Visit: https://t.co/rD28chyxrV @PMOIndia @MoHFW_India @PIB_India @MIB_India pic.twitter.com/DHoB3PKCwn
— MyGovIndia (@mygovindia) May 19, 2021
या स्पर्धेत दर महिन्याला 10 एन्ट्रींची निवड केली जाईल. तुमचा फोटो-एन्ट्रीची निवड झाल्यास, 5000 रुपये दिले जातील. MyGovIndia च्या अधिकृत ट्विटमध्ये याची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता, तसंच या लिंकमध्ये विजेत्यांची नावंही देण्यात आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus