8 दिवसात 4.66 कोटींचं नुकसान, यात तुमचेही पैसे नाही ना?

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 487 अंकांच्या घसरणीसह 37 हजार 789 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 138 अंकांच्या घसरणीसह 11 हजार 359 अंकांवर बंद झाला.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 06:22 PM IST

8 दिवसात 4.66 कोटींचं नुकसान, यात तुमचेही पैसे नाही ना?

मुंबई/नवी दिल्ली, 08 मे: जगभरातील शेअर बाजारात आलेल्या मंदीचे पडसाद भारतातील शेअर बाजारात उमटत आहेत. आज बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सलग सहाव्या दिवशी घसरणीसह बंद झाला. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या ट्रेड वॉर मुळे जगभरातील सर्वच गुंतवणुकदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळेच अनेक जण शेअर बाजारातील पैसे काढून घेत सोन्यात गुंतवत आहेत. बुधवारी आशियायी आणि युरोपीय बाजारातील विक्रीचा परिणाम भारतात देखील दिसला.

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 487 अंकांच्या घसरणीसह 37 हजार 789 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 138 अंकांच्या घसरणीसह 11 हजार 359 अंकांवर बंद झाला. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांचे मुल्य 1.52.09.721.43 कोटींवरून घसरत ते 1,47,43,074.21 कोटींवर पोहोचले आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 4.66 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आता काय कराल?

जगातील शेअर बाजाराचा घटनांचा भारतातील शेअर बाजारावर परिणाम होत आहे. पण बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी थोडाफार नफा मिळवण्यास हरकत नाही. निवडणुकीच्या निकालानंतर फंडामेंटल शेअर्सवर पैसे लावले पाहिजेत, असे मत बाजारातील तज्ञांनी व्यक्त केले आहे. ट्रेड वॉर सर्वांसाठी धोकादायक

जगातील सर्वात मोठे गुंतवणुकदार असलेल्या वॉरेन बफे यांच्यामते, अमेरिकेने जर चीनवर 25 टक्के टॅरिफ लावला तर ही गोष्ट संपूर्ण जगासाठी वाईट ठरेल. या दोन्ही देशातील ट्रेड वॉरचा गुंता सुटणे हेच सर्वांच्या भल्याचे आहे. चीनच्या प्रगतीमुळे संपूर्ण जगाचे भलं होणार आहे.

Loading...

शेअर बाजाराला मोठा फटका

मे महिन्यात गेल्या आठ दिवस 6 शेअर बाजारात घसरण होत आहे. आज सेन्सेक्समध्ये 480 अंकांनी घसरला. तर निफ्टीत देखील घसरण झाली. सेन्सेक्समधील मिडकॅप इंडेक्स एक टक्क्यांनी, स्मॉलकॅप इंडेक्स 1.21 टक्क्यांनी घसरला. इक नव्हे तर तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

कोणत्या इंडेक्समध्ये किती घसरण झाली (टक्क्यांमध्ये)

तेल आणि गॅस इंडेक्स-1.36

खासगी बँका- 0.93

सार्वजनिक बँका- 1.4

निफ्टी

ऑटो इंडेक्स- 1.34

एफएमसीजी इंडेक्स- 0.55

आयटी इंडेक्स- 0.45

मेटल इंडेक्स- 0.70

मीडिया इंडेक्स-4.5

फार्मा इंडेक्स- 1.6

रियल्टी इंडेक्स- 2.1


शिकारी आणि शिकार एकाच विहिरीत रात्रभर मुक्कामी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...