मराठी बातम्या /बातम्या /देश /

आफताबभोवतीचा फास आणखी आवळला, ती पाच हत्यारं पोलिसांना सापडली!

आफताबभोवतीचा फास आणखी आवळला, ती पाच हत्यारं पोलिसांना सापडली!

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केलेले हत्यारं दिल्ली पोलिसांना सापडली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केलेले हत्यारं दिल्ली पोलिसांना सापडली आहेत. दिल्ली पोलिसांनी पाच धारदार चाकू जप्त केली आहेत. दरम्यान ही हत्यारं फॉरेन्सिक टीमकडे तपासासाठी पाठवण्यात आली आहेत. दिल्लीत झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही हत्यारं दिल्ली पोलिसांना मिळाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे.

श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांत, पोलिसांनी 5 मोठे चाकू जप्त केले आहेत जे तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे ठेवले; आफताबने ठेवलाय हिशोब, धक्कादायक माहिती उघड

दरम्यान श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली सोबतच वसई पोलिसांकडून तपास सुरू आहे. भाईंदर खाडी परिसरात वसई

पोलिसांकडून तपास करण्यात आला. भाईंदर खाडीमध्ये आफताबने मोबाईल फेकल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. हा मोबाईल खाडीत मिळतो का या दृष्टीनं खाडीमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं आहे.

श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून दिल्लीतील विविध भागात फेकले. आफताब अमीन पूनावाला श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा हिशेब ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रद्धाची हत्या गळा दाबून नाही तर.. दिल्ली पोलिसांची नवीन थिअरी, घटनेची मोठी अपडेट

First published: