सोनिया गांधींच्या बैठकीला शरद पवारांची दांडी !

आजच्या बैठकीला एनसीपीच्या बैठकीत अनुपस्थितीमुळे शरद पवार ही नितीश कुमार यांच्या वाटेवर जाणार का अशी चर्चा आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2017 07:06 PM IST

सोनिया गांधींच्या बैठकीला शरद पवारांची दांडी !

11 आॅगस्ट :  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दांडी मारल्यामुळे तर्कवितर्काना उधाण आलंय.

संसदेच्या सत्रानंतर सुद्धा मोदी सरकारला घेरण्यासाठी सोनिया गांधींनी आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला यूपीएचे घटक पक्ष असलेले सिताराम येचुरी, ममता बॅनर्जीसह सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला एनसीपीचा एकही नेता उपस्थित नाही. नेहमी शरद पवार या बैठकीला हजर असतात. मात्र, यावेळी त्यांनी दांडी मारली.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनसीपीच्या आमदारांनी काँग्रेसला मतदान केले नव्हते. त्यामुळे काँग्रेस-एनसीपीचे संबंध ताणले होते. आजच्या बैठकीला एनसीपीच्या बैठकीत अनुपस्थितीमुळे शरद पवार ही नितीश कुमार यांच्या वाटेवर जाणार का अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close