मराठी बातम्या /बातम्या /देश /

'त्या' पत्रावरून शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार, म्हणाले...

'त्या' पत्रावरून शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार, म्हणाले...

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना 2010 साली लिहिलेल्या पत्राबद्दल खुलासा केला आहे.

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना 2010 साली लिहिलेल्या पत्राबद्दल खुलासा केला आहे.

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना 2010 साली लिहिलेल्या पत्राबद्दल खुलासा केला आहे.

    नवी दिल्ली, 08 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकरी नवी दिल्लीत आंदोलन (farmer protest) करत आहे. राष्ट्रवादीनेही शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) माझं पत्र वाचून दाखवत आहे, पण त्यांनी आधी ते नीट वाचावे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी लगावला आहे. शरद पवार हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. कृषी कायदा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उद्या बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. त्याआधी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना 2010 साली लिहिलेल्या पत्राबद्दल खुलासा केला आहे. 'कृषीमंत्री असताना मी ते पत्र लिहिले होते हे खरं आहे. पण, माझ्या पत्राचा जी लोकं उल्लेख करीत आहे. त्यांनी माझे पत्र नीट वाचावे. मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असं बोललो आहे. पण आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहे. त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे', अशी टीका पवार यांनी केली. 'आम्ही उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 5.30 वाजता भेट घेणार आहोत. त्यावेळी त्यांच्याकडे कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनाबद्दल मागणी करणार आहोत' असंही पवार यांनी सांगितले. काय म्हणाले होते फडणवीस ? 'शरद  पवार यांनी 2010 मध्ये अनेक पत्र लिहून कृषी सुधारणा सुचवल्या होत्या. शरद पवार यांच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख आहे. अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी, असं पवार म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची आताची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे.  डीएमकेनं 2016 साली असंच काही आश्वासन दिलं होतं. आप ने हे कायदे मंजूर केले आहे. अकाली दल 12 डिसेंबर 2012 रोजी एपीएमसी दलालांचे अड्डे बनले आहेत असं म्हटले होते. त्यामुळे मोदी सरकारविरोधातील या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे,  वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या