भीमा-कोरेगाव प्रकरण हाताळण्यात सरकार कमी पडलं - शरद पवार

भीमा-कोरेगाव प्रकरण हाताळण्यात सरकार कमी पडलं - शरद पवार

शांतता प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही समाजातल्या लोकांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

  • Share this:

04 जानेवारी : भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीवर आणि त्यानंतर महाराष्ट्रभर झालेल्या बंद यावर आज राज्यसभेत चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस सरकारनं हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यात कमी पडल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तर फोडा आणि राज्य करा या हेतूनं हा प्रकार भडकवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

काय बोलले शरद पवार?

200 वर्षांपूर्वी लढाई झाली होती. त्यात पेशव्यांच्या सेनापतीला हरवण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं. त्यात महार रेजिमेंट होती. ज्या ठिकाणी हरवलं, तिथे विजयस्तंभ उभारलाय. तिथे दर वर्षी दलित लोक जातात. पण इतक्या वर्षात कधीच काही झालं नाही.

जवळच्या वढू या गावात, दोनशे वर्षापूर्वी शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मोघलांनी केली होती. त्यांची समाधी वढूमध्ये आहे. संभाजींच्या समाधीचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, ते दलित समाजाचे होते. त्यांचीही समाधी तिथेच आहे.

दुर्दैवाने एक महिन्यापूर्वी काही समाजकंटकांनी तिथे विध्वसंक काम केलं. त्या समाजकंटकांचं मी नावं घेणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारने त्यांची नावं आरोपी म्हणून घेतली आहे. त्यांची नावं काही वेळापूर्वी सभागृहात रजनीताईंनी घेतली होती, (संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे)  त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत आणि न्यायालयीन चौकशीही होणार आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणं उचित ठरणार नाही.

शांतता प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही समाजातल्या लोकांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

First published: January 4, 2018, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading