जनता शहाणी आहे, तीच नरेंद्र मोदींना पर्याय देईल- शरद पवार

जनता शहाणी आहे. तीच मोदींना पर्याय निर्माण करेल. या आधी अनेकदा जनतेनं ते दाखवून दिलं आहे

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2018 04:39 PM IST

जनता शहाणी आहे, तीच नरेंद्र मोदींना पर्याय देईल- शरद पवार

मुंबई,ता. 27 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा असा नेहमीच प्रश्न असतो. सांकेतिक आणि सावधपणे बोलत नेमका संदेश पोहोचविण्यात पवारांचा हातखंड आहे. राष्ट्रवादीच्या आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलतानाही त्यांनी हेच संकेत दिले आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही. ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल. बदलास सगळ्यांनी तयार असलं पाहिजे. अशी भूमिका घेणाऱ्या पक्षालाच राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असं मत पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. या आधी राहुल गांधी यांनी काँग्रेसला जागा मिळाल्या तर मीच पंतप्रधान होणार असं वक्तव्य केलं होतं. जनता शहाणी आहे, तीच मोदींना पर्याय उभा करल असं सांगत पवारांनी काँग्रेसचं नेतृत्व मोदींना पर्याय ठरू शकत नाही हेच सूचित केल्याचं बोललं जातंय.

त्यानंतर पवारांनी काँग्रेसचं नेतृत्व मान्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आणि आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला नाही असंही सांगून टाकलं. त्यामुळे पवार हे राहुल गांधींच्या उमेदवारीला पाठिंबा देणार नाहीत हे स्पष्ट झालं. मोदींना पर्याय काय आहे असं लोक विचारतात पण जनता शहाणी आहे.

तीच मोदींना पर्याय निर्माण करेल. या आधी अनेकदा जनतेनं ते दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले. ज्या पद्धतीने विचारवंतांच्या हत्या झाल्या त्या म्हणजे धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला आहे. ज्या संघटना चुकीचं काम करत आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे असंही ते म्हणाले.

VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...