…तर देशाचा पंतप्रधान ठरवण्यात शरद पवारांची महत्त्वाची भूमिका

…तर देशाचा पंतप्रधान ठरवण्यात शरद पवारांची महत्त्वाची भूमिका

निकालापूर्वी आता राजधानी दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. पण, सत्तास्थापनेसाठी आणि राजकीय गणितं जुळवण्यासाठी राजधानी दिल्लीत मात्र आत्तापासून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपला बहुमत न मिळाल्यास पंतप्रधान कोण असणार? सत्ता कोण स्थापन करणार यावर खलबतं सुरू झाली आहेत. याच पार्श्वभूमिवर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबु नायडू यांनी राजधानी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अखिलेश यादव आणि मायावती यांची देखील भेट घेतली. चंद्राबाबु यांच्या हालचाली म्हणजे तिसऱ्या आघाडीची तयारी असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी काँग्रेसला पंतप्रधानपदामध्ये रस नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप व्यतिरिक्त कुणालाही पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. त्यामुळे आता अनेक नवी राजकीय समीकरणांची नांदी ही दिल्लीमध्ये पाहायाला मिळत आहे.

...म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते राहुल गांधी खोटं बोलत आहेत

कर्नाटक मॉडेलचा करणार वापर

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देश पातळीवर देखील कर्नाटक मॉडेलचा वापर होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला साथ दिली होती. शिवाय, कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देखील दिलं होतं. त्यामुळे आता देश पातळीवर कर्नाटक मॉडेलचा वापर होणार का? हे पाहावं लागणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

मायावती – अखिलेश कधी खोलणार पत्ते?

दरम्यान, अखिलेश आणि मायावती 23 मे रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र लढत असून त्यांना किती जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे चंद्राबाबु नायडू आणि मायावती देखील आपल्याला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पाहत आहेत.

मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं मार्मिक ट्विट, महत्त्वाच्या 18 घडोमोडींचा वेगवान आढावा

First published: May 18, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading