VIDEO : 'शरद पवार पंतप्रधान होणार', राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचं मोठं विधान

लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 01:05 PM IST

VIDEO : 'शरद पवार पंतप्रधान होणार', राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचं मोठं विधान

नवी दिल्ली, 30 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं विधान माजिद मेमन यांनी केलं आहे. 'सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात मोट बांधावी आणि शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान करावे, असं आवाहन मेमन यांनी केलं आहे. 2019मध्ये एनडीएचं सरकार येणार नाही, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवावं. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास, शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं मोठं विधान मेमन यांनी केलं आहे. देशाला एका अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.Loading...

पंतप्रधान मोदींची विरोधकांवर खोचक टीका

दरम्यान, दुसरीकडे बिहारमधील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. जे विरोधी पक्षनेतेदेखील होऊ शकत नाही, तिच लोक आता पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. टीका करताना मोदींनी विरोधकांचा  'महामिलावट' असा उल्लेखदेखील केला.वाचा अन्य बातम्या

स्थिर सरकार हा पवारांच्या राजकारणातील एक परवलीचा शब्द - उद्धव ठाकरे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की,

'भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमत मिळवण्यास अपयशी ठरली तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात'. विशेष म्हणजे यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा अन्य तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरू शकतात, असंही म्हटलं.

याच मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

पवारांच्या नावाचीही चर्चा

दरम्यान, शरद पवार यांचंही नाव कायमच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहिलं आहे. यावेळी जर कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यास पवारांचं नाव पुढे येऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे, नारायण राणे, राजू शेट्टी, यांच्यापासून ते अगदी ममता बॅनर्जी एम. के. स्टॅलिन, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, नितीश कुमार, शरद यादव आणि अगदी तेजस्वी यादवपर्यंत अनेक राज्यांच्या अनेक पक्षांच्या संपर्कात शरद पवार असतात.

गेल्या काही काळात शरद पवार या यादीतल्या सगळ्यांना आणि आणखीही काही नेत्यांना भेटले. तिसऱ्या आघाडीची शक्यता चाचपडून बघताना अशी आघाडी झालीच तर त्यात महत्त्वाची भूमिका महाराष्ट्राचा हाच मुरलेला राजकारणी निभावणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

पवारांसाठी ही शेवटची संधी?

शरद पवार यांचं लक्ष दिल्लीच्या तख्ताकडे आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुका ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असल्याचं मानलं जातं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांच्या खास मर्जीतले कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार पंतप्रधान होतील, असं म्हटलं होतं. पवार स्वतः मात्र याबाबत उघडपणे काही बोललेले नाहीत. उलट त्यांनी पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...