मराठी बातम्या /बातम्या /देश /

शरद पवारांचं धक्कातंत्र! मंत्रिमंडळविस्ताराचा मुहूर्त ठरला; मुसेवालाच्या मारेकऱ्यांचा एन्काउंटर TOP बातम्या

शरद पवारांचं धक्कातंत्र! मंत्रिमंडळविस्ताराचा मुहूर्त ठरला; मुसेवालाच्या मारेकऱ्यांचा एन्काउंटर TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 जुलै : शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. त्यापूर्वी सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली आहे. कोर्टाने 1 ऑगस्टपर्यंत दोन्ही गटाला आपली भूमिका लेखी स्वरुपात मांडण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने राज्यात ओसीबींना राजकीय आरक्षण देण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. तिकडे पंजाबमध्ये काल गायक सिद्धू मुसेवाला याचे मारेकरी चकमकीत ठार झाले. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत जाणून घ्या.

शरद पवारांचं धक्कातंत्र!

एकीकडे महाराष्ट्रात रोजच नवनव्या राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) धक्कातंत्राचा वापर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे, याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख अखेर ठरली

महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. येत्या 22 जुलैला म्हणजेच शुक्रवारी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या दिवशी 12 मंत्री आपल्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

उद्धव ठाकरेंचा जखमी शिवसैनिकाशी फोनवर संवाद

कल्याण उप शहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर सकाळी काही अज्ञातांनी सशस्त्र हल्ला केला. यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची गंभीर थेट 'मातोश्री'ने दखल घेतली आहे. खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जखमी पालांडे यांना फोन करून विचारपूस केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

आदित्य ठाकरे 'पवार' स्टाईलने मैदानात, पावसात भिजून कार्यकर्त्यांशी संवाद

आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेल्यामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही आता जायला लागले आहेत, त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मैदानात उतरले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

27 महापालिकांमध्ये ओबीसींना किती आरक्षण?

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातला ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगाने राज्यात 37 टक्के ओबीसी असल्याचं सांगत त्यांना 27 टक्के आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली आहे. या शिफारसीसोबतच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी आणि एसटी लोकसंख्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तिकडे ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील 4 शूटर्सचा पाक बॉर्डरपासून 10 किमीवर एन्काउंटर

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणारे चार शूटर पोलिस चकमकीत ठार झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी या चार मारेकऱ्यांना चकमकीत ठार केले आहे. यामध्ये जगरूप रूपा आणि मनप्रीत मनू या गुंडांचा समावेश आहे तर इतर दोन गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Eknath Shinde, शरद पवार. sharad pawar