VIDEO : शरद पवारांची डिनर 'डिप्लोमसी', बैठकीला राहुल गांधी आणि केजरीवालही उपस्थित

VIDEO : शरद पवारांची डिनर 'डिप्लोमसी', बैठकीला राहुल गांधी आणि केजरीवालही उपस्थित

देशातल्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांशी पवारांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर पवारांचा अनुभव महाघाडीसाठी उपयोगात येणार आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : सोळाव्या लोकसभेचं अधिवेशन आज संपलं आणि दिल्लीत बैठकांनी वेग घेतला. मोदी हटावचा अजेंडा घेऊन विरोधी पक्ष व्ह्युरचना आखण्यात मग्न आहेत. बुधवारी बैठकींचं केंद्र होतं शरद पवारांचं घर. 6 जनपथ या पवारांच्या बंगल्यात दिवसभर नेत्यांचा राबता होता. रात्री शरद पवारांनी नेत्यांना जेवण दिलं.

लोकसभेच्या अधिवेशनामुळे राष्ट्रीय स्तरावरचे अनेक नेते दिल्लीत होते ही संधी साधत शरद पवारांनी विरोधीपक्षांच्या नेत्यांना एकत्र आणलं. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पवारांचं ज्येष्ठत्व मान्य करत दिसभरात दोन वेळा पवारांच्या घरी गेले.

रात्री शरद पवारांनी सर्व नेत्यांना जेवण दिलं.

यावेळी राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला, अरविंद केजरीवाल, तृणमूलचे अनेक नेते उपस्थित होते. 2014 च्या आधी केजरीवाल हे शरद पवारांवर तुटून पडत होते. राजकारणाच्या नव्या समिकरणाने केजरीवाल आणि पवार यांना एकत्र आणलं आहे.

तर राहुल गांधीं लवचिकता दाखवत पवारांच्या घरी गेल्याने राजकीयदृष्ट्या महत्त्वातं मानलं जाते. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात भक्कम आघाडी उभारण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. त्यात आता शरद पवारांनीही लक्ष घातलं आहे.

देशातल्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांशी पवारांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर पवारांचा अनुभव महाघाडीसाठी उपयोगात येणार आहे.

First published: February 13, 2019, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading