पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकावर काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकावर काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत भाषण केलं. राज्यसभेच्या बैठकीचं हे 250वं सत्र असल्यानं पंतप्रधानांनी भाषणात संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या योगदानाची चर्चा केली. पंतप्रधान म्हणाले, लोकांच्या भाव-भावनांचं हे सभागृह प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेच्या माध्यमातूनच देशासाठी मोठं योगदान दिलं. त्यामुळे राज्यसभेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र हे करताना राज्यसभेनेनं अडवणुकीचं कारण न बनता प्रवाही राहावं असं मतही त्यांनी व्यक्त केलं आणि हे करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुक केलं. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार म्हणाले, आज राज्यसभेत जी भाषणं झालीत त्यात मोदींनी राष्ट्रवादीचा उल्लेख केला. त्याचं एक कारण आहे. मी काही वर्षापूर्वी भाषण करताना म्हणालो होतो की, माझ्या 52 वर्षांच्या संसदीय राजकारणात मी एकदाही वेलमध्ये गेलो नाही. कारण सभागृहाची प्रतिष्ठा जपली पाहिजे पाहिजे. विरोध करण्यालाही काही मर्यादा असतात. त्या पाळल्याच पाहिजेत मोदींनी त्याचा संदर्भ देत भाषण केलं. त्यामुळे राजकारण करू नये.

शरद पवार सोनियांना भेटले; पण महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच कायम

काय म्हणाले होते पंतप्रधान?

पंतप्रधान म्हणाले, आंदोलनं आणि इतर कारणांमुळे संसदेचा वेळ वाया जातो. राज्यसभेत विविध मुद्यांवर अधिक गंभीरपणे आणि विस्तृत चर्चा होणं अपेक्षीत आहे. मात्र गोंधळ आणि गदारोळात आजकाल सगळा वेळ वाया जातो. त्यातून काहीही निघत नाही. याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे. राजकीय पक्षांनीही विरोध करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. हे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचं कौतुक केलं.

रामदास आठवले संजय राऊतांच्या भेटीला, मांडला मुख्यमंत्रिपदाचा नवा फॉर्म्युला!

पंतप्रधान पुढे म्हणाले, राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतली होती की विरोध करत असताना कधीही सभागृहाच्या 'वेल'मध्ये उतरणार नाही. अशीच भूमिका भाजपनेही घेतली होती आणि मला सांगताना आनंद वाटतो की राष्ट्रवादीने अनेक कठीण प्रसंगातही या भूमिकेचं पालन केलं. भाजपनेही हा नियम पाळला आणि हे करत असताना त्याचा कुठलाही राजकीय तोटा राष्ट्रवादी आणि भाजपलाही झाला नाही.

महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक करण्याला वेगळं महत्त्व असून भाजपचं हे नवं महाराष्ट्र कनेक्शन आहे का याची चर्चा सुरू झालीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 18, 2019, 8:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading