मराठी बातम्या /बातम्या /देश /

शरद पवारांनी फोन केला पण उद्धव ठाकरेंनी..., राणेंचा खोचक टोला

शरद पवारांनी फोन केला पण उद्धव ठाकरेंनी..., राणेंचा खोचक टोला

 'मी जेव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे'

'मी जेव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे'

'मी जेव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे'

  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 08 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आज भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane cabinet minister) यांनी लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फोन करून अभिनंदन केलं पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी फोन केला नाही, असं म्हणत राणेंनी शिवसेनेला खोचक टोला लगावला.

आज सकाळी नारायण राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं.

'कोणतंही खातं छोटं किंवा मोठं नसतं. मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे' असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

'गल्यानं साखली सोन्याची' हे मराठी कपल ठरतंय सुपरहिट; VIDEO झाले व्हायरल

'मला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शरद पवार यांनी मला फोन केला. आणि चांगले काम करा, असा सल्ला पवारांनी दिला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मन एवढं मोठं नाही. मला मंत्रिपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले नाही' अशी खंतही नारायण राणेंनी बोलून दाखवत निशाणा साधला.

अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर राणे कामाला लागले. राणेंनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पण अधिकारी आज बैठकीला तयारी करून आले नव्हते. त्यामुळे राणे यांनी आपल्या सर्व स्टाफला बाहेर काढून  मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला.

IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO चं मोठं वक्तव्य

मंत्रालयात किती अधिकारी अनुपस्थित आहे याची माहिती मागितली. 'मी मंत्रालयात पदभार घ्यायला येणार आहे हे माहीत असताना देखील तयारी का केली नाही', असा सवाल करत राणेंनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रत्येक अधिकाऱ्यांनी बैठकीला येताना नोट सोबत आणावे असे देखील सुनावले.

जवळपास 1 तासाच्या बैठकीत 30 मिनिट अधिकाऱ्यांची राणेंनी झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. राणेंनी झाडाझडती घेतल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.

First published:

Tags: Narayan rane, Sharad pawar, Uddhav thacakrey