आपल्या शिष्याच्या शपथविधीला शरद पवारांनी जाणं टाळलं, त्याचं हे आहे कारण

संसदीय कारकिर्दीचा 50 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले पवार हे देशातले दिग्गज नेते आहेत. प्रोटोकॉलनुसार शक्य नसलं तरी त्यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेता त्यांची आसनव्यवस्था ही पहिल्याच रांगेत पाहिजे होती.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 10:29 PM IST

आपल्या शिष्याच्या शपथविधीला शरद पवारांनी जाणं टाळलं, त्याचं हे आहे कारण

प्रशांत लीला रामदास नवी दिल्ली 30 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांना गुरू मानतात. त्याचचं बोट धरून मी राजकारण शिकलो असं मोदींनी जाहीर भाषणात सांगितलं होतं. तेव्हापासून पवार आणि मोदींच्या केमेस्ट्रीची चर्चा कायम होत असते. राजकारणात ऐकमेकांवर टीकेचे प्रहार करत असले तरी त्यांच्यातल्या ओलावा कायम असतो. आज मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत होते मात्र या कार्यक्रमाला शरद पवार गैरहजर राहिले त्याचं कारणही तसच महत्त्वाचं आहे.

देशातल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. शरद पवारांनाही निमंत्रण पत्रिका आणि पास पाठविण्यात आला होता. शपथविधीच्या दिवशी पवारांनी जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की त्यांची आसन व्यवस्था ही पाचव्या रांगेत करण्यात आली आहे त्यामुळे पवारांनी मोदींच्या शपथविधी समारंभाला जाण्याचेच टाळले. कार्यक्रमाला न जाता त्यांनी घरीच टीव्हीवर शपथविधीचा सोहळा पाहिला.

संसदीय कारकिर्दीचा 50 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले पवार हे देशातले दिग्गज नेते आहेत. प्रोटोकॉलनुसार शक्य नसलं तरी त्यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेता त्यांची आसनव्यवस्था ही पहिल्याच रांगेत पाहिजे होती असं म्हटलं जातं. पवारांचे भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदीही पवारांना खास मानही देतात त्यामुळे या कार्यक्रमाला पवार नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यक्रमाला राजकारणाव्यतिरिक्त विविध क्षेत्रातले 8 हजार मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे सगळ्यांची आसव्यवस्था करताना अधिकाऱ्यांकडून ही चूक झाली असावी अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. या आधी अनेकदा बैठकीसाठी शरद पवारांना आपल्या कार्यालयात न बोलवता नितीन गडकरी हे अधिकाऱ्यांना घेऊन थेट पवारांच्या घरी गेल्याचंही उदाहरण आहे त्यामुळे ही चूक झालीच कशी याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...