BREAKING गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीच्या वाटेवर

BREAKING गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीच्या वाटेवर

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत ते आज राष्ट्रवादीत सामील व्हायची शक्यता आहे. सुरुवातीला भाजप, मग काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीच्या मार्गावर वाघेला नवी राजकीय खेळी खेळतील.

  • Share this:

अहमदाबाद, 29 जानेवारी : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत ते आज राष्ट्रवादीत सामील व्हायची शक्यता आहे. दुपारी 3  वाजता यासंदर्भात ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

राष्ट्रवादीत जाण्याअगोदर वाघेला काँग्रेसमध्ये होते आणि त्याही आधी भाजपमध्ये होते. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल या  राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.

भाजप, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करत वाघेला गुजरातमध्ये राजकारणाची नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतूनच वाघेलांच्या पक्षप्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

गुजरातमधली वाघेलांची मोठी खेळी ही होती

भाजप, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करत 78 वर्षांचे वाघेला गुजरातमध्ये राजकारणाची नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतूनच वाघेलांच्या पक्षप्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांची कारकीर्द सुरू झाली होती भारतीय जनता पक्षाबरोबर. ते गुजरातमध्ये क्षत्रियांचे मोठे नेते मानले जायचे. 1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली आणि त्या वेळी वाघेलांऐवजी केशुभाई पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आलं. त्यामुळे दुखावले गेलेले वाघेला यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी गुजरातमध्ये त्यांनी मोठी राजकीय खेळी करत काँग्रेसकडून समर्थन मिळवलं. काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देताच 1996 वाघेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले. मनमोहन सिंग सरकारकमध्ये त्यांना कापडउद्योग मंत्री म्हणून केंद्रात स्थान दिलं गेलं.

गुजरात विधानसभेत ते काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही काम करत होते.

First published: January 29, 2019, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading