मराठी बातम्या /बातम्या /देश /'हिंदू राष्ट्राने आपलं कल्याण होणार नाही'; शंकराचार्यांनी राजकारणावरुन कडक सुनावलं

'हिंदू राष्ट्राने आपलं कल्याण होणार नाही'; शंकराचार्यांनी राजकारणावरुन कडक सुनावलं

शंकराचार्यांनी हिंदू राष्ट्राच्या मागणीवर त्यांचं मत मांडलं आहे. ते ऐकून लोक त्यांना वैचारिक प्रबोधक म्हणत कौतुक करत आहेत.

शंकराचार्यांनी हिंदू राष्ट्राच्या मागणीवर त्यांचं मत मांडलं आहे. ते ऐकून लोक त्यांना वैचारिक प्रबोधक म्हणत कौतुक करत आहेत.

शंकराचार्यांनी हिंदू राष्ट्राच्या मागणीवर त्यांचं मत मांडलं आहे. ते ऐकून लोक त्यांना वैचारिक प्रबोधक म्हणत कौतुक करत आहेत.

  इंदूर, 26 मे : देशातील राजकारणात आपल्याला दररोज 'हिंदू राष्ट्रा'ची चर्चा पाहायला मिळते. बरेच राजकारणी हिंदू राष्ट्र, तसंच हिंदू-मुस्लिम यावर सातत्याने बोलत असतात. काही वेळा तर संतही हिंदू राष्ट्राबद्दल विधानं करत असतात. पण, संत समाजाच्या वतीने जेव्हा अशी विधानं केली जातात, तेव्हा लोकांमध्ये संभ्रम तयार होतो. सध्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं एक वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यांनी हिंदू राष्ट्राच्या मागणीवर त्यांचं मत मांडलं आहे. ते ऐकून लोक त्यांना वैचारिक प्रबोधक म्हणत कौतुक करत आहेत.

  शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती मध्य प्रदेशमधील छिंदवाडा भेटीवर होते. या वेळी त्यांनी हिंदू राष्ट्रावरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल भाष्य केलं. हिंदू राष्ट्राने आपलं भलं होणार नाही, आपल्याला रामराज्य हवं आहे, असं ते म्हणाले. धर्मनिरपेक्ष राष्ट्राबद्दल लोकांचा असंतोष हे हिंदू राष्ट्राच्या मागणीचं मुख्य कारण असू शकतं; पण हिंदू राष्ट्र झाल्यास इतर धर्माच्या लोकांमध्ये परकेपणाची भावना तयार होईल, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

  हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या 4 मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, 'अडचण ही आहे की आपल्या इथलं राजकारण हे ध्रुवीकरणाचं राजकारण झालं आहे. लोकांच्या मध्ये एक रेषा आखली जाते. त्या रेषेच्या आत आपण आहोत की नाही, हे पाहिलं जातं. त्यात असणारे वाईट असले तरी चांगले असतात व त्यात नसणारे चांगले असतील तरी वाईट असतात. आपणच ही वागण्याची पद्धत बनवली आहे. देशात असंच राजकारण सुरू आहे. खरं तर राजकारण हा शब्द खूप उच्च आहे. तो धर्माइतका मोठा आहे आणि राजकारण म्हणजे राजाने पाळलेलं धोरण, असा त्याचा अर्थ होतो.'

  'काँग्रेस असो की भाजप मत मागायला येणाऱ्यांना दांड्याने..', खासदाराच्या वक्तव्याने खळबळ

  'रामायण आणि महाभारतात राजकारण शब्दाचा वापर झाला होता. राजकारण असेल तर गोष्ट वेगळी, पण आजकाल तर ते राजकारण राहिलेलं नाही. सध्या ध्रुवीकरण किंवा एकाधिकारशाहीचं राजकारण सुरू आहे. अशा प्रकारच्या राजकारणात एक शब्द वापरला जातो 'हिंदु राष्ट्र'. हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदूंचा एकाधिकार. असा हिंदूंच्या नावाने देशात एकाधिकार झाला तर आपोआपच हिंदू नसलेल्या इतर समाजांमध्ये परकेपणाची भावना निर्माण होईल,' असंही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

  First published:
  top videos

   Tags: Hindu, Madhya pradesh, Muslim