Home /News /national /

रशियन अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा लांबूनच नमस्कार, VIDEO व्हायरल

रशियन अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा लांबूनच नमस्कार, VIDEO व्हायरल

संरक्षण मंत्र्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे, कोरोनाच्या काळात रशियन अधिकाऱ्यांना हात मिळविण्यापासून ते लांबच राहिले

    मॉस्को: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शांघाई संघटन (Shanghai Cooperation Organisation -SCO) च्या बैठकीसाठी रशियाला पोहोचले आहेत. संरक्षणमंत्री बुधवारी रात्री मॉस्कोला पोहोचले. यादरम्यानचा एक व्हिडीओ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये ते रशियाच्या अधिकाऱ्यांना हात न मिळविता पारंपरिक पद्धतीने नमस्ते करीत असताना दिसत आहेत. संरक्षणमंत्र्यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, आज सायंकाळी मॉस्कोला पोहोचलो. काल रशियाचे जनरल सर्गेई शॉयगू यांच्यासह द्विपक्षीय बैठकीबाबत उत्साहित आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मॉस्को एअरपोर्टवर रशियान अधिकारी त्यांचं स्वागत करीत असताना दिसत आहे. येथे त्यांना आणण्यासाठी मेजर जनरल बुख्तीव यूरी निकोलाइविच आले होते. व्हिडीओमध्ये राजनाथ सिंह यांच्यासह रशियात भारतीय राजदूत डीबी वेंकटेश वर्मा आहेत. यामध्ये संरक्षणमंत्र्यांनी मास्क लावलेला आहे. त्यांचं स्वागत केल्यानंतर रशियन आर्मीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सॅल्यूट करीत हात मिळविण्यासाठी आपला हात पुढे केला, मात्र संरक्षणमंत्र्यांनी आपले हात जोडत त्यांना नमस्ते म्हटलं. त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला अशाचप्रकारे अभिवादन केलं. हे ही वाचा-भाजपच्या माजी महिला अध्यक्षाच्या मुलाची हत्या; दुकानात घुसून भोसकल्याचा VIDEO कोरोनाव्हायरसच्या काळात जगभरातील नेते नमस्तेचं म्हणतात संरक्षणमंत्री येथे SCO च्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी झाले आहेत. यामध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरक्षेबाबत मदत वाढविण्यासाठी रशियासोबत द्विपक्षीय बैठक घेण्यात आली. या संघटनेत भारत, रशिया, कजाकिस्तान, चीन, किर्गिज़स्तान, पाकिस्तान, रशिया, तजिकिस्तान आणि उज़्बेकिस्तान या 8 देशांचा सहभाग आहे. या बैठकीत 8 देशातील संरक्षण मंत्री दहशतवाद आणि त्यातून देशाची सुरक्षा आणि याविरोधात एकत्रितपणे लढाई आदी मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान गंभीर वाद सुरू आहेत. सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात चीनच्या कुरापती सुरूच आहे. गलवान खोऱ्यानंतर चीनने पुन्हा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rajnath Singh (Politician), Russia

    पुढील बातम्या